तैमूरला मम्मी करिना कपूरच्या ‘या’ गोष्टीची येते प्रचंड चीड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 22:31 IST2017-07-25T17:01:30+5:302017-07-25T22:31:30+5:30

अभिनेत्री करिना कपूर-खान तिच्या चिमुकल्या तैमूरवर जीवापाड प्रेम करते. कुठल्याही इव्हेंट समारंभात किंवा माध्यमांशी बोलताना, मुलाखत देताना ती तिच्या ...

Timur's mom Kareena Kapoor's 'This' is a huge hit! | तैमूरला मम्मी करिना कपूरच्या ‘या’ गोष्टीची येते प्रचंड चीड!!

तैमूरला मम्मी करिना कपूरच्या ‘या’ गोष्टीची येते प्रचंड चीड!!

िनेत्री करिना कपूर-खान तिच्या चिमुकल्या तैमूरवर जीवापाड प्रेम करते. कुठल्याही इव्हेंट समारंभात किंवा माध्यमांशी बोलताना, मुलाखत देताना ती तिच्या लाडक्या तैमूरचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. करिनाच्या मते तिचा लाडका तैमूर जगातील सर्वांत गुडलुकिंंग मुलगा आहे. वास्तविक आम्हीदेखील करिनाच्या मताशी काही प्रमाणात सहमत आहोत. कारण तैमूर खरोखरच खूप गोंडस मुलगा आहे. करिनाने आपल्या लाडक्याच्या करामती सांगताना एका मुलाखतीत म्हटले होते की, तैमूरला खूपच राग येतो. जेव्हा मी त्याच्या गालाला किस करण्यासाठी जाते तेव्हा तो त्याच्या इवल्याशा बोटांनी मला धक्का देतो. वास्तविक लहानग्यांचे असे करणे स्वाभाविक आहे. कारण मुलांना वारंवार किस किंवा प्रेम केले तर त्यांची चिडचिड होत असते. अशातही करिना तैैमूरला दिवसातून अनेकदा किस करीत असते. 

करिनाने नुकत्याच फिल्मफेअर मुलाखतीत हे गुपित उघड केले. पुढे बोलताना करिना म्हणाली होती की, वास्तविक तैमूर खूप शांत मुलगा आहे. शिवाय तो खूप सुंदर आहे. फक्त त्याला माझ्या एकाच गोष्टीची चिड येते. जेव्हा मी त्याला दिवसातून वीस हजार वेळा किस करते. तेव्हा माझ्या या वागण्यामुळे तो खूपच चिडचिड करतो. मी जवळ गेले की, तो मला धक्का देतो. मात्र जेव्हा-जेव्हा तो असे करतो तेव्हा-तेव्हा मला त्याचा लाड करावसा वाटतो. आम्हा दोघा मायलेकांचा हा प्रताप मात्र सैफ चांगलाच एन्जॉय करतो. 



करिनाचा लाडका तैमूर आता सात महिन्यांचा झाला आहे. एवढ्या कमी वयात त्याची इंटरनेटवर प्रचंड क्रेझ आहे. कारण जेव्हा त्याचा एखादा फोटो इंटरनेटवर लीक होतो तेव्हा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातो. आता तर करिनापेक्षा अधिक त्याची फॅन फॉलोइंग असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच करिनाने तैमूरला माध्यमांसमोर आणले होते. ती पहिलीच वेळ होती जेव्हा तैमूरने मीडियाचे कॅमेरे अतिशय जवळून बघितले. 

खरं तर तैमूर जेथे जातो तेथे मीडियाचे कॅमेरे त्याच्या मागे असतात. त्याचा प्रत्येक फोटो करिना आणि सैफच्या चाहत्यांसाठी आवडीचा ठरतो. करिनाने असेही म्हटले होते की, तैमूरचा लुक माझे वडील रणधीर कपूरप्रमाणे आहे. पण काहीही असो, तैमूर सध्या इंटरनेटवर धूम उडवून देत असून, जसजसा मोठा होत आहे, तसे त्याचे रूप अधिकच खुलत आहे. 

Web Title: Timur's mom Kareena Kapoor's 'This' is a huge hit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.