"मी मरेपर्यंत...", गोविंदावर अजूनही जीवापाड प्रेम करते सुनीता आहुजा, विश्वासघाताबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:43 IST2025-11-21T10:42:42+5:302025-11-21T10:43:26+5:30
Sunita Ahuja Breaks Silence On Emotional Vs Physical Cheating Debate : गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा त्यांच्या खासगी आयुष्यावर मोकळेपणाने बोलत आहे. अनेक लोक त्याला पसंती देत आहेत, तर काही लोक यावर टीका करत आहेत. आता सुनीता आहूजाने गोविंदासोबतच भावनिक आणि फिजिकल विश्वासघातावर भाष्य केले आहे.

"मी मरेपर्यंत...", गोविंदावर अजूनही जीवापाड प्रेम करते सुनीता आहुजा, विश्वासघाताबद्दल म्हणाली...
गोविंदा(Govinda)प्रमाणेच त्याची पत्नी सुनीता आहुजा(Sunita Ahuja)चा स्वभावही उत्साही आहे. ती आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करते. लोकांना तिची स्पष्टता आणि खास वक्तव्ये खूप आवडत आहेत. प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्यासाठी सुनीताने तिचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. तिने आता नातेसंबंध आणि विश्वासघातावर भाष्य केले. सुनीता आहूजा तिच्या फॉलोअर्ससाठी नियमितपणे व्लॉग्स शेअर करत आहेत. केवळ ३ महिन्यांत तिने मोठी फॅन फॉलोइंग मिळवली आहे. सुनीताने लेटेस्ट मुलाखतीत सध्या ट्रेंडिंग असलेल्या ऑनलाइन चर्चेवर आपले मत व्यक्त केले. तिने सांगितले की, भावनिक आणि शारीरिक विश्वासघात यापैकी कोणती जास्त वाईट आहे?
पिंकविलाने जेव्हा सुनीता आहूजाला विचारले की भावनिक आणि शारीरिक विश्वासघातापैकी कोणती अधिक वेदनादायक आहे, तेव्हा गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा म्हणाल्या, ''भावनात्मक. तुम्ही भावनिक पातळीवर एका व्यक्तीवर प्रेम करता आणि नंतर त्याला धोका देता, हे योग्य नाही.'' सुनीता पुढे म्हणाली की, ''पाहा मी खूप भावनिक आहे. मी मरेपर्यंत गोविंदावर प्रेम करत राहीन. मी तुम्हाला सांगते. भावनिक स्तरावर कोणीही मला धोका दिला, मग ते माझी मुले असोत, माझा नवरा असो, मला खूप दुःख होते. भावनिक स्तरावर कोणालाही धोका देऊ नका, हे चांगले नाही यार.''
''याला म्हणतात घोर कलियुग...''
सुनीता आहुजाला जेव्हा विचारले गेले की शारीरिक विश्वासघात ठीक आहे का, तेव्हा ती म्हणाली की, ''तेही करू नये. हे दोन्ही का करायचे आहे तुम्हाला? हे योग्य नाही. मला वाटते की हे सगळे चांगले नाही. आमच्या आई-वडिलांनी असे संस्कार दिलेले नाहीत.'' सुनीताला जेव्हा सांगितले गेले की आज समाजात अनेक लोक विश्वासघाताला सामान्य मानतात, तेव्हा ती म्हणाली, ''पण ते चुकीचे आहे. पाहा, याला म्हणतात घोर कलियुग. हे कलियुग आले आहे.'' भावनिक आणि शारीरिक विश्वासघातावर नेहमीच चर्चा होत राहिली आहे, परंतु ट्विंकल खन्ना आणि काजोल यांच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या चॅट शोमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला.