टायगर श्रॉफच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 19:52 IST2018-12-27T19:50:56+5:302018-12-27T19:52:26+5:30

डान्स करताना टायगरमधली ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. यांत टायगर डान्समध्ये शाहिद कपूरला कडवी टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tiger Shroff’s Dancing skill will stunned you, dance video viral | टायगर श्रॉफच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

टायगर श्रॉफच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

बॉलीवुडचा अॅक्शन हिरो म्हणून अभिनेता टायगर श्रॉफने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. टायगर केवळ फायटिंगच चांगली करतो असं नाही तर तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो. फॅन्स टायगरच्या डान्सिंगवर फिदा आहेत. टायगर सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो. स्वतःचे डान्स व्हिडीओ तो सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करतो. त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला असून तो व्हायरल होत आहे. टायगरने शाहिद कपूरच्या उर्वशी गाण्यावर थिरकत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. शर्टलेस होऊन आपली पिळदार बॉडी दाखवत टायगर समुद्र किनाऱ्यावर थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. डान्स करताना टायगरमधली ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. यांत टायगर डान्समध्ये शाहिद कपूरला कडवी टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. बागी आणि बागी-२ मध्ये अभिनय, अॅक्शन आणि डान्सचा जलवा दाखवल्यानंतर टायगर सध्या बागी-३ सिनेमासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमातून तरुणाईला घायाळ करण्यासाठी तसंच रसिकांची मने जिंकण्यासाठी तो टायगर मेहनत घेत आहे. 


Web Title: Tiger Shroff’s Dancing skill will stunned you, dance video viral