झहरा खान-टायगर श्रॉफच्या 'लव्ह स्टिरिओ अगेन'चा टीझर रिलीज, दोघांच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:20 IST2023-07-19T18:13:44+5:302023-07-19T18:20:22+5:30

सुप्रसिद्ध अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी झाहरा खान तिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. पण तिच्या डेब्यू चित्रपटाव्यतिरिक्त झहरा खान आणखी एका कारणाने चर्चेत होती.

Tiger shroff zahrahs khan video song love stereo again teaser out actress will debut with mohanlals vrishabh | झहरा खान-टायगर श्रॉफच्या 'लव्ह स्टिरिओ अगेन'चा टीझर रिलीज, दोघांच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

झहरा खान-टायगर श्रॉफच्या 'लव्ह स्टिरिओ अगेन'चा टीझर रिलीज, दोघांच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी झहरा खान तिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. पण तिच्या डेब्यू चित्रपटाव्यतिरिक्त झहरा खान आणखी एका कारणाने चर्चेत होती. अभिनेत्री लवकरच टायगर श्रॉफसोबत एका व्हिडिओ गाण्यातही दिसणार आहे. या गाण्याचा टीझर समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. टीझरमधील अभिनेत्रीचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.


ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांची मुलगी झहरा खान हिच्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याशिवाय झहरा लवकरच मोहनलाल यांच्या 'वृषभ' चित्रपटात दिसणार आहे. हा पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणारा चित्रपट असेल, ज्यामध्ये शनाया कपूर देखील पदार्पण करणार आहे. 


भूषण कुमार निर्मित ‘लव्ह स्टिरिओ अगेन’ या अभिनेत्रीचे सर्वाधिक लोकप्रिय गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्यातील टायगर श्रॉफ आणि झहरा एस खान यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांना आवडली आहे. नुकताच या रोमँटिक गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहून लोकांची गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. चाहते आता या गाण्याची वाट पाहत आहेत. 

या गाण्याशिवाय टायगर श्रॉफ आणि झहरा हे दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी चर्चेत असतात. टायगरच्या 
वर्कफ्रंटबाबत  बोलायचे झाले तर, लवकरच तो 'बडे मियाँ छोटे मियाँ २.०' मध्ये दिसणार  आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमारही दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरही दिसणार आहे. अक्षय कुमारसोबत टायगरचा हा पहिलाच चित्रपट असेल. तर झहरा शनाया कपूरसोबत वृषभमध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे.
 

Web Title: Tiger shroff zahrahs khan video song love stereo again teaser out actress will debut with mohanlals vrishabh

टॅग्स :Tigerवाघ