थिएटरमध्ये आपटला, आता ओटीटीवर येणार टायगर श्रॉफचा 'बागी ४'; कधी आणि कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:36 IST2025-10-06T17:36:29+5:302025-10-06T17:36:57+5:30
टायगर श्रॉफचा 'बागी ४' ओटीटीवर येणार

थिएटरमध्ये आपटला, आता ओटीटीवर येणार टायगर श्रॉफचा 'बागी ४'; कधी आणि कुठे?
अभिनेता टायगर श्रॉफला 'बागी' या फ्रँचायझीमुळे लोकप्रियता मिळाली. श्रद्धा कपूरसोबतचा त्याचा पहिला 'बागी' खूप गाजला. नंतर 'बागी २' ठीकठाक चालला. यात दिशा पाटनी मुख्य भूमिकेत होती.तर २०२० मध्ये आलेल्या 'बागी ३'मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख हेही होते. गेल्या महिन्यात 'बागी ४' रिलीज झाला आणि चांगलाच आपटला. आता हाच सिनेमा ओटीटीवर येत आहे. कधी आणि कुठे?
साजिद नाडियाडवाला निर्मित 'बागी' फ्रँचायझीचा चौथ्या भागाला क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवर सिनेमाची निराशाजनक कामगिरी राहिली. आता सिनेमा ओटीटीवर येण्यास सज्ज आहे. अॅमेझॉन प्राईमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा स्ट्रीम होणार आहे. अद्याप रिलीज डेट समोर आलेली नाही. मात्र या महिन्याच्या अखेरपर्यंत सिनेमा ओटीटीवर एन्ट्री करेल असा अंदाज आहे. सिनेमाच्या रिलीजआधीच प्राईमने व्हिडिओने डिजीटल राइट्स विकत घेतले होते. त्यामुळे टायगरच्या चाहत्यांना लवकरच सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी ४'चं एकूण बजेट ८० कोटींच्या आसपास होतं. तर सिनेमाने केवळ ४७.४० कोटींची कमाई केली. जगभरात सिनेमाने ६६.३९ कोटींचा आकडा गाठला. यावरुन 'बागी ४' सपशेल आपटला. सिनेमात टायगर श्रॉफसोबत संजय दत्त, सोनम बाजवा, हरनाज संधू, श्रेयस तळपदे आणि सौरभ सचदेवा यांची भूमिका होती.