दिशा पटानीच्या लाइफमधून टायगर श्रॉफ आऊट? नवीन प्रेमाच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:52 IST2020-02-01T16:52:16+5:302020-02-01T16:52:38+5:30

दिशा पटानी टायगर श्रॉफसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. मात्र आता तिने प्रेमाच्या शोधात असल्याचे सांगितले.

Tiger Shroff Out from Disha Patani's Life? In search of new love | दिशा पटानीच्या लाइफमधून टायगर श्रॉफ आऊट? नवीन प्रेमाच्या शोधात

दिशा पटानीच्या लाइफमधून टायगर श्रॉफ आऊट? नवीन प्रेमाच्या शोधात

बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानी व अभिनेता टायगर श्रॉफ हे दोघे रिलेशनशीपमुळे चर्चेत यायचे. मात्र दोघांनी याबद्दल कधीही उघडपणे जाहीर केले नाही. दिशा पटानीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितलं ज्यातून समजलं की ती जीवनात प्रेमाच्या शोधात आहे.


दिशा म्हणाली की, माझ्या जीवनात मी कित्येक वर्षांपासून प्रेमाच्या शोधात आहे. मला आतापर्यंत कुणीच प्रपोझ केले नाही. 


ती पुढे म्हणाली की, मी शाळेत असताना टॉमबॉय होते आणि वडील पोलिस होते. कदाचित त्यामुळे सर्व मुले मला प्रपोझ करण्यासाठी घाबरत असतील. कुणाचीच माझ्याकडे पाहण्याची हिंमत नव्हती. त्यामुळे कुणी मला प्रपोझ करण्याची हिंमत दाखवली नाही.


रिपोर्ट्सनुसार दिशा पटानीने सांगितले की, जेव्हापासून ती मुंबईत आली आहे तेव्हापासून तिला मस्तमौला जीवन जगण्याची संधी मिळाली नाही आणि लोकांना भेटायला व त्यांच्यावर प्रेम करण्याचीही संधी नाही. 


एका इव्हेंटमध्ये जेव्हा दिशाला टायगरला डेट करत असल्याबाबत विचारलं, त्यावर ती म्हणाली की, कित्येक वर्षांपासून मी माझे नशीब आजमावत आहे, पण काहीही झालं नाही.


नुकतेच तिने पिंकव्हिलाशी बोलताना सांगितलं की, मुलगी असल्याचे मला तेव्हा जाणवतं जेव्हा मी रिलेशनशीपमध्ये असते. मला अशा व्यक्तीची गरज आहे जो मला मी मुलगी असल्याची जाणीव करून देईल.


गेल्या बऱ्याच काळापासून दिशा व टायगर यांच्या रिलेशनशीपबाबत खूप चर्चा झाली आहे. कित्येक वेळा दोघे पार्टी व एकत्र दिसले आहेत. ते दोघे नेहमीच एकमेकांना चांगले मित्र असल्याचे सांगतात. काही दिवसांपूर्वी दिशाने सांगितलं होतं की, मागील काही वर्षांपासून टायगरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यात यश मिळालं नाही.

दिशा पुढे म्हणाली की, आम्ही एकत्र जेवायला जातो, फिरतो मात्र याचा आर्थ हा नाही की टायगर माझ्यावर इंप्रेस झाला आहे. टायगर व मी लाजाळू आहोत. त्यामुळे दोघांमध्ये पुढे काहीही घडत नाही.

Web Title: Tiger Shroff Out from Disha Patani's Life? In search of new love