पॉवरफुल अ‍ॅक्शनचा धमाका!  पाहा, टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’चा धमाकेदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 13:11 IST2020-02-06T13:09:35+5:302020-02-06T13:11:07+5:30

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात...

tiger shroff film baaghi 3 trailer released | पॉवरफुल अ‍ॅक्शनचा धमाका!  पाहा, टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’चा धमाकेदार ट्रेलर

पॉवरफुल अ‍ॅक्शनचा धमाका!  पाहा, टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’चा धमाकेदार ट्रेलर

ठळक मुद्दे‘बागी 3’चे  दिग्दर्शन अहमद खानने केले असून निर्मिती साजिद नाडियालवालाची आहे.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ पुन्हा एकदा श्रद्धा कपूरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसत आहेत.  ‘बागी’ फ्रंचाईजीमधील हा तिसरा सिनेमा आहे. काही क्षणांपूर्वी ‘बागी 3’चा ट्रेलर रिलीज झाला आणि टायगरचे चाहते पुन्हा एकदा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आलेत.
ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसतो. टायगरला एकापाठोपाठ एक असे अनेक रोमांचक स्टंट करताना पाहून चाहते क्रेजी झाले आहेत. साहजिकच टिष्ट्वटरवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.


‘बागी 3’मध्ये  रितेश देशमुख टायगरचा भाऊ विक्रमची व्यक्तिरेखा साकारतो आहे. पोलिस अधिकारी असलेला विक्रम  कामासाठी सिरीयामध्ये जातो आणि अचानक एक दिवस त्याचे अपहरण होते. आपल्या भावाला वाचवण्यासाठी टायगर सिरीयात जातो आणि तिथे पाहायला मिळातो त्याचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार. ट्रेलरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत टायगरचा अ‍ॅक्शन अवतार दिसतोय.


 ‘बागी’ फ्रेंचाईजीच्या तिन्ही पार्टमध्ये टायगर आहे. ‘बागी’मध्ये तो  श्रद्धा कपूरसोबत रोमान्स करताना दिसला होता. तर ‘बागी 2’मध्ये तो दिशा पाटनीसोबत दिसला होता. त्यानंतर आता ‘बागी 3’मध्ये पुन्हा एकदा श्रद्धा कपूर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात टायगरला पोलीस अटक करताना दिसले होते.


‘बागी 3’चे  दिग्दर्शन अहमद खानने केले असून निर्मिती साजिद नाडियालवालाची आहे. या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: tiger shroff film baaghi 3 trailer released