भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी येतोय 'टायगर', सलमानचा आणखी एक खास मॅसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:56 PM2023-10-12T12:56:58+5:302023-10-12T13:01:47+5:30

सलमानचा पुन्हा एक खास मॅसेज चाहत्यांच्या भेटीला आला आहे. 

'Tiger' is coming to watch the India vs Pakistan match live, message by Salman | भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी येतोय 'टायगर', सलमानचा आणखी एक खास मॅसेज

Salman Khan

अभिनेता सलमान खान 'टायगर-3' चित्रपटामधून लवरकच चाहत्यांच्या भेटीला येत आहे.  'टायगर-3' बद्दल चाहत्यांमधली उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चित्रपटाचे निर्मातेही सलमान खानच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येतयं. आता सलमानचा पुन्हा एक खास मॅसेज चाहत्यांच्या भेटीला आला आहे. 

सलमान खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तो म्हणतोय की, तुम्हाला माहितीयं हे मिशन सर्वांत महत्वाचं का आहे. कारण, मला पाकिस्तान विरुद्ध भारताचा सामना पाहायचा आहे. ते पण लाईव्ह, तर मी येतोय ऑन क्रिकेट लाईव्हवर १४ ऑक्टोंबरला साडेबारा वाजता. आणि या दिवाळीला तुमच्या जवळच्या चित्रपटागृहात माझा 'टायगर 3' चित्रपट पहा'. सलमानच्या या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. 

यशराज फिल्म्सने 'टायगर 3' च्या प्रमोशनसाठी ब्रॉडकास्ट नेटवर्क, स्टार स्पोर्ट्स सोबत करार केलायं. संपूर्ण विश्वचषकादरम्यान 'टायगर'ची डरकाळी ऐकायला मिळणार आहे. स्टार स्पोर्ट्सवरील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या थेट सामन्यात 'टायगर 3' चित्रपटाचं प्रमोशन होणार आहे.  इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाची एवढी मोठी मार्केटिंग केली जाणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. तर 16 ऑक्टोबरला 'टायगर 3'  चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. टायगर-3 च्या प्रमोशनसाठी सलमान खानने स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित होणारा प्रोमोही शूट केला आहे.  हा प्रोमो भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान चालवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर  'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 'पठाण' शाहरुख खानही या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.

Web Title: 'Tiger' is coming to watch the India vs Pakistan match live, message by Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.