फारसा सिनेमात झळकत नसला तरी करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे तुषार कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 16:24 IST2021-11-20T16:22:51+5:302021-11-20T16:24:06+5:30

तुषार कपूरने चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये जसे हवे तसे फार काही यश त्याला मिळाले नाही.

Though not been providing many blockbuster, Tushar kapoor is not less than any richest man, check his net worth here | फारसा सिनेमात झळकत नसला तरी करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे तुषार कपूर

फारसा सिनेमात झळकत नसला तरी करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे तुषार कपूर

बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूरला हवे तसे बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. अगीद हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच सिनेमात तो झळकला. मात्र तरीही तुषार कपूर त्याचे स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांचा मुलगा आहे. लहानपणची त्याला अभिनयाचे बालकडून घरातूनच मिळाले आहे.  2001 मध्ये आलेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘क्या कूल है हम’ आणि ‘गोलमाल’ सारखे सिनेमातही तो झळकला. तुषार कपूर आलिशान आयुष्य जगतो.तुषार कपूर सध्या तरी चर्चेत नसला तरी त्याच्या एकूण कमाईमुळे त्याची चर्चा होत आहे. 


तुषार कपूरने चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये जसे हवे तसे फार काही यश त्याला मिळाले नाही. तरीही तुषार कपूर आज कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण त्याच्या एकट्याच्या संपत्तीची आकडा हा नक्कीच थक्क करणारा आहे. त्याची एकूण संपत्ती  37 कोटी इतकी आहे.चित्रपट जाहीरातीतून त्याने ही संपत्ती कमावली असल्याचे बोलले जाते.तुषार महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. बड्या ब्रँड्सच्या गाड्या त्याच्याकडे आहेत. विशेष म्हणजे त्याने स्वतःच्या कमाईतून या गाड्या खरेदी केल्या आहेत. पोर्शे, ऑडी क्यु ७, बिएमडब्ल्यु ७ सारख्या ब्रँडेड गाड्यांचे कलेक्शन त्याच्याकडे आहे. तुषार आता अभिनेत्यासोबत निर्माता देखील आहे. अभिनयापेक्षा निर्मिती करणे आव्हानात्मक असले तरी निर्मिती क्षेत्रात काम करणे त्याला आवडते.


मुळात तुषारला अभिनेता म्हणून करिअर बनवायचे नव्हते. तो परदेशात शिक्षणासाठी गेला होता.जेव्हा तो अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करुन परतल्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ' तुझे मेरी कसम' चित्रपटाची त्याला ऑफर मिळाली. अभिनय करता येईल की नाही याचा फार विचार न करता त्याने लगेगच होकार दिल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. 

तुषार कपूरच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याने लग्न केलेले नाही.अविवाहीत असलेला तुषार कपूर सरोगसीद्वारे पिता बनला होता.लक्ष्य असे त्याच्या मुलाचे नाव.अनेकदा तुषार लक्ष्यसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत असतात. लक्ष्य ही आता खपू मोठा झाला आहे. मुळात लक्ष्यला आत्तापासून कुकींगची आवड असल्याचे त्याची आत्या एकता कपूरनेच कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते. 
 

Web Title: Though not been providing many blockbuster, Tushar kapoor is not less than any richest man, check his net worth here