Alia Bhatt In London: प्रेग्नेंट आलिया भटचा Unseen फोटो होतोय व्हायरल, नो मेकअप लूकमध्येही चेहऱ्यावर दिसतोय ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:09 PM2022-07-01T14:09:21+5:302022-07-01T14:17:23+5:30

लंडनमधील आलियाचा Unseen फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नो मेकअप लूकमध्ये आलिया तेवढीच सुंदर दिसतेय.

This unseen picture of pregnant alia bhatt is going viral seen in loose clothes and no makeup look | Alia Bhatt In London: प्रेग्नेंट आलिया भटचा Unseen फोटो होतोय व्हायरल, नो मेकअप लूकमध्येही चेहऱ्यावर दिसतोय ग्लो

Alia Bhatt In London: प्रेग्नेंट आलिया भटचा Unseen फोटो होतोय व्हायरल, नो मेकअप लूकमध्येही चेहऱ्यावर दिसतोय ग्लो

googlenewsNext

Alia Bhatt In London: आलिया भट(Alia Bhatt)  तिच्या हॉलिवूड डेब्यू 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone)च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. यादरम्यान आलिया तिची बहीण शाहीन भट(Shaheen Bhatt)सोबत रिमा जैन आणि तिच्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. त्यांच्यासोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवली देखील. यावेळी तिच्यासोबत चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar) ही दिसला.
 

लंडनमध्ये करणसोबत पोज देताना आलियाचा अनसीन फोटो समोर आला आहे. यावेळी आलिया मेकअपशिवाय  ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये कंम्फर्टेबल दिसली. या फोटोमध्ये ती करण जोहर आणि एका चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे.

रणवीर सिंगसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी लंडनमध्ये आहेत, जे इशारा देतात की आलिया आणि रणवीर त्यांच्या आगामी चित्रपट रॉकी और रानी की प्रेम काहानीच्या सीक्वेंसचे शूटिंग करू शकतात. ज्याचे दिग्दर्शन करण करत आहे. आलिया भटने अभिनेता रणबीर कपूरसोबत १४ एप्रिल रोजी सात फेरे घेतले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. ही बातमी कळताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सध्या आलिया तिचे प्रोजेक्ट पूर्ण करत आहे.

आलिया रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी रणबीर कपूर पत्नी आलिया भटसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशिवाय रणबीर कपूरकडे अनेक चित्रपट आहेत


 

Web Title: This unseen picture of pregnant alia bhatt is going viral seen in loose clothes and no makeup look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.