लक्झरी लाइफला या टॉपच्या अभिनेत्रीचा रामराम? मातीच्या चुलीवर दिसली जेवण बनवताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 17:47 IST2022-10-02T17:46:57+5:302022-10-02T17:47:19+5:30

चुलीवर जेवण बनवतानाचा अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल

this top actress quit luxury life o? Seen cooking food on the clay stove | लक्झरी लाइफला या टॉपच्या अभिनेत्रीचा रामराम? मातीच्या चुलीवर दिसली जेवण बनवताना

लक्झरी लाइफला या टॉपच्या अभिनेत्रीचा रामराम? मातीच्या चुलीवर दिसली जेवण बनवताना

भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानी  (Kajal Raghwani) सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे काजलच्या लव्ह लाईफच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे, काजल तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, काजल राघवानीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तिच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. हा फोटो पाहून तिने इंडस्ट्रीतून संन्यास घेऊन गावाला गेल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. तिचा हा फोटो व्हायरल होतो आहे. 

काजल राघवानी ही भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काजल लवकरच मेरे पति की शादी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती निरहुआ आणि आम्रपालीसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता काजल राघवानीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती मातीच्या चुलीवर हसतमुखाने स्वयंपाक करताना दिसत आहे.

मेहंदी ग्रीन कलरच्या साडीतील काजलचा साधेपणा लोकांना खूप आवडला आहे. फोटो शेअर करत काजलने लिहिले की, माझ्या घरी नाश्ता करायला या. काजलचा फोटो पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत.  तुम्हाला वाटत असेल की अभिनेत्रीने ग्लॅमर जग सोडून ग्रामीण जीवन स्वीकारले आहे, तर तसे नाही. या फोटोचे वास्तव काही औरच आहे.


खरे तर हा फोटो तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील आहे. काजल राघवानीच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण यूपीच्या आझमगडमध्ये सुरू आहे. ती अनेकदा चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत असते. काजल राघवानी भोजपुरी इंडस्ट्रीला रामराम केलेला नाहीये. 

Web Title: this top actress quit luxury life o? Seen cooking food on the clay stove