प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा असा दिसायचा निक जोनस, फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 06:00 IST2023-06-14T06:00:00+5:302023-06-14T06:00:01+5:30

Priyanka Chopra And Nick Jonas : अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनास कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असते.

This is what Nick Jonas looked like when Priyanka Chopra became Miss World, you will be speechless after seeing the photo | प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा असा दिसायचा निक जोनस, फोटो पाहून व्हाल अवाक्

प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा असा दिसायचा निक जोनस, फोटो पाहून व्हाल अवाक्

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) व तिचा नवरा निक जोनास (Nick Jonas) कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असते. प्रियांका चोप्रा वयाच्या १९ व्या वर्षी मिस वर्ल्ड झाली होती. तिने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्नगाठ बांधली. प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक जोनस कसा दिसायचा, हे दाखवणारा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने १ व २ डिसेंबर, २०१८ ला राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग पार पडले होते. त्या दोघांचे लग्न जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडले होते. प्रियांका आणि निक कायम चर्चेत असतात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यामधील अंतर... प्रियांकापेक्षा निक वयाने खूप लहान आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरात प्रियांकाचा जन्म झाला.  २००० मध्ये वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांनतर हॉलिवूडमध्येही तिने आपला ठसा उमटवला. दोस्ताना या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे देसी गर्लनंतर तिला देसी गर्ल अशी ओळख मिळाली.   

निक जोनसने प्रियांकाला प्रपोज केल्यानंतर त्यांनी एकमेकांना तीन वर्षे डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. राजस्थानमधील जोधपूरमध्ये २०१८ साली या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात लग्न केले. या दोघांमध्ये तब्बल ११ वर्षांचं अंतर आहे. याचा अर्थ जेव्हा प्रियांका २००० साली मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक ८ वर्षांचा होता. प्रियांकाच्या सासूनेही याबद्दल सांगितले आहे. २००० मध्ये मिस वर्ल्डच्या सोहळ्याच्या वेळी निकची आई, वडील आणि भाऊ त्या सोहळ्याला गेले होते. निक ८ वर्षांचा होता तर निकचे भाऊ ८-९ वर्षांचे होते. सध्या प्रियांका चोप्रा ही ४० वर्षांची आहे तर निक २९ वर्षांचा आहे. ते दोघे लॉस अँजेलिसमध्ये वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत.

Web Title: This is what Nick Jonas looked like when Priyanka Chopra became Miss World, you will be speechless after seeing the photo