"त्या गोष्टीमुळे मी दुखावलो गेलो होते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 17:12 IST2017-11-02T11:42:42+5:302017-11-02T17:12:42+5:30

नुकताच ऐश्वर्या राय बच्चन आपला वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण ...

"That thing made me hurt." | "त्या गोष्टीमुळे मी दुखावलो गेलो होते"

"त्या गोष्टीमुळे मी दुखावलो गेलो होते"

कताच ऐश्वर्या राय बच्चन आपला वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्यावर आजही अनेक सेलिब्रिटी फिदा आहेत. १९९४ मध्ये जेव्हा ऐशने मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावे केला होता तेव्हापासून बॉलिवूडमध्ये तिच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. तिच्या सुंदरतेचे किस्से केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान तिच्या प्रेमात अक्षरश: वेडापिसा झाला होता. आजही तो ऐशला विसरू शकला नाही. कारण ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमान अजूनपर्यंत लग्न करू शकला नाही. परंतु एकमेव सलमानच तिच्यावर जीव ओवाळणारा नसून, इंडस्ट्रीमधील आणखी एक असा स्टार आहे, जो तिच्या सौंदर्यावर व निळ्या डोळ्यांवर आजही फिदा आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, “आई झाल्यानंतर ऐश्वर्याने कौटुंबिक जबाबदारीला पहिले प्राधान्य दिले आणि यासाठी तिने स्वत:चे करिअरदेखील बाजूला ठेवले. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे स्थूल शरीराविषयी अनेक चर्चा रंगल्या. काही विचित्र प्रतिक्रियाही त्या दरम्यान कानावर आल्या यामुळे मी दुखावलो गेलो होतो.'' 

पुढे अभिषेक म्हणाला,'' मात्र यावर ऐश्वर्याने कधीच तक्रार केली नाही, कधीही या गोष्टींकडे लक्ष देत जीममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यात वेळ घालवला नाही. मी दुखावलो गेलो आहे हे पाहुन तिने मला धीर दिला. ''

ALSO RAED :  Birthday Special: ​ जगतसुंदरी ते बच्चन कुटुंबाची सून...! ऐश्वर्या राय बच्चनबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी...!!

ऐश्वर्या लवकरच फन्ने खान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रेजी किया रे असे आहेत. यानंतर दुसऱ्या गाण्यात ऐश्वर्या अभिनेता राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ज्याची शूटिंग मुंबईत होणार आहे, तर तिसऱ्या गाण्यात ऐश्वर्या चित्रपटातील मुख्य अभिनेता अनिल कपूरसोबत दिसणार आहे. हे एक इमोशन गाणं असेल.   
 

Web Title: "That thing made me hurt."