या दोन अभिनेत्रींनी ‘ऑफर’ नाकारली, म्हणून मलायका ‘स्टार’ झाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 08:00 IST2019-11-30T08:00:00+5:302019-11-30T08:00:01+5:30

शाहरूख खानचा ‘दिल से’ हा सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवते ‘छैया छैया’ हे गाणे. या गाण्यातील मलायकाच्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावले.

these two actresses rejected chaiyya chaiyya song then it made malaika arora | या दोन अभिनेत्रींनी ‘ऑफर’ नाकारली, म्हणून मलायका ‘स्टार’ झाली!

या दोन अभिनेत्रींनी ‘ऑफर’ नाकारली, म्हणून मलायका ‘स्टार’ झाली!

ठळक मुद्दे‘छैया छैया’ गर्ल मलायका अरोरा खान तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.

शाहरूख खानचा ‘दिल से’ हा सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवते ‘छैया छैया’ हे गाणे. या गाण्यातील मलायकाच्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावले. या गाण्याने मलायका अरोरा सारखी नृत्यांगना बॉलिवूडला मिळाली. ‘छैया छैया’ने ख-या अर्थाने मलायकाला स्टारडम दिले, आजही ते टिकून आहे. पण या गाण्यासाठी मलायका ही पहिली पसंत नव्हती, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
कोरिओग्राफर फराह खान हिने हे गाणे कोरिओग्राफ केले होते. तिनेच हा खुलासा केला. गोव्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फराहने हा खुलासा केला.  

फराह खान म्हणाली की, ‘छैया छैया’ गाण्यासाठी आम्ही आधी शिल्पा शेट्टी आणि रविना टंडन यांना विचारणा केली होती. मात्र त्या दोघींनी नकार दिला. त्यानंतर आम्ही मलायकाशी संपर्क साधला.   मलायका अरोराने हे गाणे केले आणि त्यानंतर ती स्टार झाली.

 या गाण्याबद्दलची एक आठवण सांगताना फराह म्हणाली की,  सुरुवातीला आम्हाला रेल्वे स्थानकावर शूट करायचे होते. मात्र परवानगी मिळाली नसल्यामुळे आम्ही रेल्वेच्या छतावर शूटींग करायचे ठरवले. तब्बल चार दिवस शूटींग केल्यानंतर गाणे पूर्ण झाले.

काही दिवसांपूर्वी मलायकानेही या गाण्याचा एक किस्सा ऐकवला होता.  ‘धावत्या रेल्वेगाडीवर नाचताना मी सतत  राईट-लेफ्ट होत होती. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने माझ्या घाग-यापासून कंबरेपर्यंत आणि नंतर कंबरेपासून रेल्वेपर्यंत दोरी बांधली होती. दोरीमुळे बॅलेन्स होण्यास मला मदत मिळत होती.  मी दोरी हटवली, त्यावेळी माझ्या कंबरेतून रक्त येत होते. त्यामुळे सर्व चिंतेत पडले होते. पण ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही,’ असे तिने सांगितले होते.

Web Title: these two actresses rejected chaiyya chaiyya song then it made malaika arora