'या' अभिनेत्रींनी बिझनेसमनसोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 15:33 IST2017-04-18T12:03:29+5:302017-04-19T15:33:31+5:30

बॉलिवूडमध्ये आलेली प्रत्येक अभिनेत्री आपल्या करिअरमध्ये यशस्वी होतेच असे नाही. ज्या अभिनेत्रींचे बॉलिवूडमध्ये नाणं खणखणीत वाजले नाही त्यांनी उद्योगपतींशी ...

'These' actresses will share business with the world | 'या' अभिनेत्रींनी बिझनेसमनसोबत थाटला संसार

'या' अभिनेत्रींनी बिझनेसमनसोबत थाटला संसार

लिवूडमध्ये आलेली प्रत्येक अभिनेत्री आपल्या करिअरमध्ये यशस्वी होतेच असे नाही. ज्या अभिनेत्रींचे बॉलिवूडमध्ये नाणं खणखणीत वाजले नाही त्यांनी उद्योगपतींशी संसार थाटून बॉलिवूडला रामराम ठोकला. अशाच काही अभिनेत्रींचा घेतलेला हा आढावा.

गायत्री जोशी - आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेस' या चित्रपटात गायत्री आपल्याला शाहरुख खानसोबत दिसली होती. स्वदेस आधी काही म्युझिक अल्बममध्ये आपल्याला ती  दिसली होती. स्वदेस व्यतिरिक्त एकही चित्रपट तिच्या वाट्याला आला नाही. यानंतर तिने 2005मध्ये बिझनेसमन विकास ऑबेरॉयसोबत लग्न करुन बॉलिवूडला बाय बाय केले.  
  
अमृता अरोरा - राख, मुझसे शादी करोगी, कितने दूर कितने पास यासारख्या काही मोजक्याच चित्रपटात आपल्याला  अमृता अरोराला दिसली होती. बॉलिवूडमध्ये आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे अमृताला यश मिळवता आले नसले तरीही बॉयफ्रेंड आणि उद्योगपती असलेल्या शकील लद्दाखबरोबर लग्न करुन संसारात रमली.    
 
असिन - साऊथमध्ये आपल्याला करिअरला सुरुवात करणाऱ्या असिन थोट्टमकलला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळवता आले नाही. आमिरसोबत आलेल्या गजनी या चित्रपटामुळे असिन प्रकाशझोतात आली मात्र त्यानंतर तिच्या वाटेला फारसे चित्रपट आले नाहीत. आसिन उद्योगपती राहुल शर्माशी विवाह बंधनात अडकली.    

ईशा देओल - 2002मध्ये आलेल्या 'कोई मेरे दिलसे पुछे' या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याचित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यूचा पुरस्कारही मिळाला. मात्र त्यानंतर रूपेरी पडद्यावर झळकलेले  'ना तुम जानो ना हम', 'क्या दिल ने कहा', 'कुछ तो है' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले.  ड्रीम गर्ल हेमालीनी आणि धमेंद्र यांच्या लेकींकडून  बॉलिवूडला अनेक अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण करण्यात तिला अपयश आले. 2012 मध्ये तिने भरत तख्यानी या उद्योगपतींसह लग्नबे़डीत अडकून बॉलिवूडमधून एक्झिट घेतली.

Web Title: 'These' actresses will share business with the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.