या अभिनेत्रींसोबत शशी कपूर यांनी केले होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 11:50 IST2017-12-04T14:51:53+5:302017-12-05T11:50:29+5:30

शशी कपूर यांना 2015 ला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा पृथ्वी थिएटरमध्ये संपन्न झाला ...

These actresses were accompanied by Shashi Kapoor | या अभिनेत्रींसोबत शशी कपूर यांनी केले होते काम

या अभिनेत्रींसोबत शशी कपूर यांनी केले होते काम

ी कपूर यांना 2015 ला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा पृथ्वी थिएटरमध्ये संपन्न झाला होता. या पुरस्कार सोहळ्यानंतर शशी कपूर यांचे भाऊ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोत शशी कपूर यांच्यासोबत काम केलेल्या अनेक नायिका पाहायला मिळाल्या होत्या. शशी कपूर यांनी साठ, सत्तरच्या दशकातील अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. वहिदा रहमान यांनी कभी कभी, त्रिशुल, नमक हलाल या चित्रपटात शशी कपूर यांच्यासोबत काम केले होते तर आशा पारेख या प्यार का मौसम या चित्रपटात शशी यांच्या नायिका होत्या. झीनत तमान आणि शशी कपूर यांच्या जोडीचा सत्यम शिवम सुंदरम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. जुनुन, फकिरा यांसारख्या चित्रपटात शशी कपूर आणि शबाना आझमी यांची जोडी जमली होती तर रेखा यांनी बसेरा, उत्सव यांसारख्या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केले होते. दीवार या चित्रपटात नितू सिंग शशी कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होत्या तर नफिसा अली यांनी जुनुन या शशी कपूर यांच्या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुप्रिया पाठक यांनी कलयुग, विजेता यांसारख्या चित्रपटात शशी कपूर यांच्यासोबत काम केले होते. 

सून आणि वहिनीसोबतही जमली जोडी
नितू सिंग यांचे लग्न ऋषी कपूर यांच्यासोबत झाल्याने शशी कपूर हे त्यांचे सासरे होते. शशी कपूर यांनी त्यांच्या या लाडक्या सूनेसोबत एक और एक ग्याराह, काला पानी, काला पत्थर, दुनिया मेरी जेब में, हिरालाल पन्नालाल, दुसरा आदमी, कभी कभी, शंकर दादा, दीवार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले तर शशी यांचा पुतणा रणधीर कपूरची पत्नी बबिता यांच्यासोबत एक श्रीमान एक श्रीमती आणि हसिना मान जायेगी या चित्रपटात शशी कपूर यांची जोडी जमली होती. 

Web Title: These actresses were accompanied by Shashi Kapoor