...या अ‍ॅक्ट्रेसनी साउथच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रोवले झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 05:02 PM2017-02-23T17:02:53+5:302017-02-23T22:42:54+5:30

साउथची स्टार अभिनेत्री तापसी पन्नू सध्या साउथपेक्षा बॉलिवूडमध्ये अधिक चर्चेत आहे. त्यास कारणही तसे असून, लवकरच तिचे एक नव्हे ...

... these actresses are not only South, but also Bollywood flags in Bollywood | ...या अ‍ॅक्ट्रेसनी साउथच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रोवले झेंडे

...या अ‍ॅक्ट्रेसनी साउथच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रोवले झेंडे

googlenewsNext
उथची स्टार अभिनेत्री तापसी पन्नू सध्या साउथपेक्षा बॉलिवूडमध्ये अधिक चर्चेत आहे. त्यास कारणही तसे असून, लवकरच तिचे एक नव्हे तर दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. यात आणखी ट्विस्ट म्हणजे हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. यातील एक सिनेमा गंभीर कथानकाचा असून, एक कॉमेडीपट आहे. खरं तर एकाच अभिनेत्रीचे दोन सिनेमे तेही एकाच दिवशी रिलीज होण्याचा प्रसंग फारच क्वचित घडत असतो. बºयाचदा निर्माते त्या अभिनेत्रीची प्रसिद्धी लक्षात घेऊन असे धाडस करीत असतात. आता यावरून तुम्हाला अंदाज येईल की, ताापसीने बॉलिवूडमध्ये किती घट्ट पाय रोवले असावेत. मात्र साउथमधून बॉलिवूडमध्ये स्वत:चे वलय निर्माण करणारी तापसी ही एकमेव अभिनेत्री नसून आणखी काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 



तापसी पन्नू
तापसीने तिच्या करिअरची सुरुवात साउथ सिनेमांपासून केली. बॉलिवूडमध्ये जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तिच्या पहिल्याच सिनेमात (बेबी) तिची भूमिका जेमतेम २० मिनिटांची होती. मात्र अक्षयकुमारसारख्या बड्या स्टारसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली हे विशेष. या २० मिनिटांच्या भूमिकेत तापसीने असा काही जलवा दाखविला की, बॉलिवूड निर्मात्यांना तिला इतर सिनेमांमध्ये संधी देणे भाग पडले. आता ती ‘नाम शबाना’ या मोठ्या बॅनरच्या सिनेमात झळकणार आहे. ‘पिंक’मधील तिची भूमिका विशेष कौतुकास्पद ठरली आहे. 



तमन्ना भाटिया
तमन्ना साउथची सुपरस्टार अभिनेत्री आहे. तिने एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमध्ये काम करून साउथमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. ‘बाहुबली’सारख्या बिग बजेट सिनेमामध्येही तिची महत्त्वाची भूमिका आहे. आता ती बॉलिवूडच्या वाटेवर आहे. अजय देवगणबरोबर ती ‘हिम्मतवाला’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत होती. त्याचबरोबर ‘हमशक्ल’मध्येही ती झळकली होती. 



असीन
साउथची स्टार अभिनेत्री असलेली असीन बॉलिवूडचीही स्टार अभिनेत्री एक बनली आहे. पहिलाच सिनेमा सुपरस्टार आमिर खानसोबत करण्याची संधी मिळाल्याने ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून बघितले नाही. एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमांमध्ये ती झळकली. अक्षयकुमारसोबतची तिची केमिस्ट्री विशेष चर्चेत राहिली. 



जेनेलिया डिसूजा
जेनेलियाचीही काहीसी अशीच हिस्ट्री आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तामिळ सिनेमात काम करणाºया सिनेलियाचा पहिलाच ‘तुझे मेरी कसम’ हा बॉलिवूडपट सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातून तिच्यातील क्यूटनेसने  प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर या सिनेमातून तिला तिच्या आयुष्याचा जोडीदारही मिळाला. अभिनेता रितेश देशमुखसोबत ती विवाहबंधनात अडकली असून, आता तिला बॉलिवूड अभिनेत्री म्हणूनच ओळखले जाते. 



काजल अग्रवाल
साउथमधील प्रत्येक सुपरस्टारसोबत काम करणारी काजल अग्रवालची बॉलिवूड एंट्रीही धमाकेदारच राहिली आहे. अजय देवगणसोबत ‘सिंघम’ या सिनेमात झळकलेली काजल सध्या सगळ्यांचीच फेव्हरेट बनली आहे. आगामी काळात ती तीन बॉलिवूडपटांमध्ये झळकण्याची शक्यता आहे. 



श्रेया शरण
साउथमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर श्रेया शरण बॉलिवूडमध्येही नशीब अजमावण्याचा प्रयत्न करीत आहे. इमरान हाशमीसोबत ती ‘आवरापन’ या सिनेमात झळकली होती. अद्यापपर्यंत हवी तशी संधी मिळाली नसली तरी, श्रेया आजही त्या संधीच्या शोधात आहे. 



इलियाना डिक्रूज
इलियाना डिक्रूज हिने तिच्या करिअरची सुरुवात साउथ सिनेमांमधून केली असली तरी, तिची सध्याची ओळख बॉलिवूड अभिनेत्री अशीच केली जाते. कारण साउथच्या तुलनेतच ती बॉलिवूडपटांमध्येही झळकली आहे. ‘बर्फी’ या सिनेमामुळे तिच्या बॉलिवूड करिअरला खºया अर्थाने ब्रेक मिळाला आहे. 

Web Title: ... these actresses are not only South, but also Bollywood flags in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.