​ घराजवळ सार्वजनिक शौचालय नकोच; सलमान खानच्या कुटुंबाने केला विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 10:39 IST2017-05-03T05:09:04+5:302017-05-03T10:39:04+5:30

स्वच्छ मुंबई या उपक्रमाचा सलमान खान ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर झाला खरा. (गतवर्षी उघड्यावरील मलविसर्जनविरोधात आणि कचरा मुक्त शहर यासाठी मुंबई ...

There is no public toilet in the house; Salman Khan's family protested! | ​ घराजवळ सार्वजनिक शौचालय नकोच; सलमान खानच्या कुटुंबाने केला विरोध!

​ घराजवळ सार्वजनिक शौचालय नकोच; सलमान खानच्या कुटुंबाने केला विरोध!

वच्छ मुंबई या उपक्रमाचा सलमान खान ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर झाला खरा. (गतवर्षी उघड्यावरील मलविसर्जनविरोधात आणि कचरा मुक्त शहर यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेल्या मोहिमेचा सलमान खान ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर होता.)पण त्याच्या घराजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्याच्या हालचालींनी वेग घेताच सलमानचे वडिल सलीम खान यांनी मात्र विरोधाची भूमिका पत्करली आहे. स्वच्छ मुंबईच्या उपक्रमाअंतर्गत सलमान खानच्या घराजवळील परिसरात म्हणजेच बांद्रा बॅण्डस्टॅण्डजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्यास सुरुवात झाली. मात्र सलमानच्या कुटुंबाने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सलीम खान यांनी हे शौचालय याठिकाणी बांधू नये, अशी गळ घातली आहे. विशेष म्हणजे, त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचीही साथ मिळाली आहे. मग काय, सलमान खान, सलीम खान आणि वहिदा रेहमान यांच्या मागणीनंतर सार्वजनिक शौचालयं अन्य जागी हलवण्याच्या हालचालीही सुरुवात झाली आहे.  यासाठी सलीम खान व वहिदा रेहमान यांनी अतिशय ‘सावध’ कारण दिले आहे. आमचा शौचालय उभारण्यास विरोध नाही. आमचा या उपक्रमाला पूर्ण पाठींबा आहे. पण लोकांची वर्दळ असलेल्या अशा मोक्याच्या जागी शौचालय उभारणे योग्य नाही, असे सलीम खान यांनी म्हटली आहे. वहिदा रेहमान यांनीही त्यांच्या होत, हो मिळवली आहे. 
हे शौचालय वहिदा रहेमान यांच्या बंगल्याच्या समोर आणि सलमान खान राहत असलेल्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या अगदी जवळ आहे. आता त्यामुळे या सार्वजनिक शौचालयास विरोध होतो की काय, हे माहित नाही. हे प्रकरण अखेर कुठल्या वळणावर जाते, ते आम्ही तुम्हाला सांगूच. तोपर्यंत सलीम खान व वहिदा रहमान यांची भूमिका योग्य आहे का, यावर खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता.

Web Title: There is no public toilet in the house; Salman Khan's family protested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.