​दिशाला ‘यात’ नाही अजिबात रस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 17:17 IST2016-12-29T17:17:27+5:302016-12-29T17:17:27+5:30

बॉलिवूडमध्ये येणा-या प्रत्येक कलाकाराचे सुपरस्टार बनण्याचे स्वप्न असते. किंबहुना हेच स्वप्न घेऊन अनेकजण बॉलिवूडची वाट धरतात. पण कदाचित टायगर ...

There is no interest in 'direction' in direction | ​दिशाला ‘यात’ नाही अजिबात रस!

​दिशाला ‘यात’ नाही अजिबात रस!

लिवूडमध्ये येणा-या प्रत्येक कलाकाराचे सुपरस्टार बनण्याचे स्वप्न असते. किंबहुना हेच स्वप्न घेऊन अनेकजण बॉलिवूडची वाट धरतात. पण कदाचित टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पाटणी यापैकी नाही. होय, मला सुपरस्टार बनण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. माझे तसे अजिबात स्वप्न नाही, असे दिशाने म्हटलेय.

एका मुलाखतीत दिशाने तिचे हे विचार बोलून दाखवले. तुला अपयशाची भीती वाटते का? असा एक प्रश्न दिशाला विचारण्यात आला. यावर दिशाने नकारार्थी उत्तर दिले. मुळात मी सुपरस्टार बनण्यासारखा कुठलाही उद्देश घेऊन बॉलिवूडमध्ये आले नाहीय. मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनण्यातही कुठलाही रस नाहीय. त्यामुळेच कदाचित मला अपयशाची भीतीही नाहीय, असे दिशाने स्पष्ट केले.

मला काम करायला आवडते. मला कॅमेरा आवडतो आणि कॅमेºयासमोर अभिनय करायला आवडतो. अभिनयात वेगवेगळ्या भूमिका करायला मला आवडते. मग त्यात डान्सिंगपासून तर इतर सगळ्या गोष्टी आल्यात. जे काही नवे ट्राय करायला मिळेल, ते मी करेल. पण हे करताना, मी नेहमी टॉपवरच राहिल किंवा सर्वोत्कृष्ट राहिल, असे होऊ शकत नाही. त्यामुळेच माझ्या डोक्यात तूर्तास असा विचार नाही आणि तसाही असा विचार करण्याची ही वेळही नाही. कारण मी आत्तापर्यंत केवळ एक सिनेमा केलाय. मला केवळ चांगले सिनेमे करायचेत आणि चाहत्यांचे प्रेम मिळवायचे आहे, असे ती म्हणाली. एकंदर काय, तर दिशाचे ‘व्हिजन’ अगदी स्पष्ट आहे. आता व्हिजन इतके स्पष्ट म्हणल्यावर दिशा लांबचा पल्ला गाठणारच, यात जराही शंका नाही. तेव्हा दिशाला यासाठी शुभेच्छा देऊ यात!

२०१५ मध्ये ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे दिशाने बॉलिवूड डेब्यू केले होते.
 

Web Title: There is no interest in 'direction' in direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.