अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे़ मियां छोटे मियां'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:06 PM2024-03-23T19:06:19+5:302024-03-23T19:06:51+5:30

बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miya Chote Miyan) घेऊन येत आहे. यात टायगर श्रॉफही दिसणार आहे.

The trailer of Akshay Kumar and Tiger Shroff's Bade Mian Chhote Mian will be released on this day | अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे़ मियां छोटे मियां'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे़ मियां छोटे मियां'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miya Chote Miyan) घेऊन येत आहे. यात टायगर श्रॉफही दिसणार आहे. या सिनेमाच्या रिलीजला फार दिवस उरले नाहीत. दरम्यान, अक्षय कुमारने 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच त्याने सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये तो बाकीच्या प्रमुख स्टार कास्टसह ॲक्शन अवतारात दिसत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या लेटेस्ट पोस्टरची झलक दाखवली आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ ॲक्शन अवतारात दिसत आहेत. सर्वजण बुलेट प्रूफ जॅकेट घालून हातात बंदुका घेऊन दिसत आहेत. काळ्या रंगाच्या एसयूव्हीसमोर सर्वांनी दमदार शैलीत पोझ दिली. पोस्टरमध्ये टायगर, अक्षय, मानुषी आणि आलियाचे जबरदस्त लूक दिसत आहेत.

या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर होणार प्रदर्शित 
चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर कोणत्या दिवशी रिलीज होणार आहे. त्याने लिहिले की,अॅक्शनचा एक मोठा डोस घेऊन येत आहे 'बडे मियाँ छोटे मियाँ '. या चित्रपटाचा ट्रेलर २६ मार्च २०२४ रोजी लाँच होणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल, २०२४ रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

साउथचा स्टार दिसणार व्हिलनच्या भूमिकेत
टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. हा बिग बजेट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईशिवाय 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे शूटिंग लंडन, अबुधाबी, स्कॉटलंड आणि जॉर्डनमध्ये झाले आहे. या चित्रपटात हॉलिवूड लेव्हल ॲक्शन असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: The trailer of Akshay Kumar and Tiger Shroff's Bade Mian Chhote Mian will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.