हृतिक रोशनच्या वाढदिवशी रिलीज होणार 'द रोशन्स', या सीरीजमध्ये शाहरुख-प्रियंका झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 12:40 IST2024-10-25T12:39:50+5:302024-10-25T12:40:44+5:30

हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

The Roshans To Release On 10 January 2025 On Netflix On Hrithik Roshan Birthday Shah Rukh Khan Priyanka Chopra | हृतिक रोशनच्या वाढदिवशी रिलीज होणार 'द रोशन्स', या सीरीजमध्ये शाहरुख-प्रियंका झळकणार!

हृतिक रोशनच्या वाढदिवशी रिलीज होणार 'द रोशन्स', या सीरीजमध्ये शाहरुख-प्रियंका झळकणार!

अभिनेता हृतिक रोशन हा कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  रोशन कुटुंबावर बनलेली डॉक्युमेंटरी यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोशन कुटुंबाचा वारसा यामध्ये पाहायला मिळणार आहे

आता या डॉक्युमेंटरीच्या रिलीजबाबत नवीन माहिती समोर आली आहे. ही तारीख खास आहे, कारण ती हृतिक रोशनच्या 51 व्या वाढदिवसाला प्रदर्शित होत आहे. 2025 हे रोशन कुटुंबासाठी एक महत्त्वाचे वर्ष असेल. 14 जानेवारी 2000 रोजी प्रदर्शित झालेल्या हृतिकच्या 'कहो ना...प्यार है' या डेब्यू चित्रपटाचा 25 वर्ष पुर्ण होतील. तरर करण अर्जुन (1995), राकेश रोशन दिग्दर्शित आणि शाहरुख खान आणि सलमान खान अभिनीत सिनेमाला 13 जानेवारी 2025 रोजी 30 वर्ष पुर्ण होतील.

 शशी रंजन दिग्दर्शित 'द रोशन्स' केवळ कुटुंबातील सदस्य नव्हे तर शाहरुख, प्रियंका चोप्रा आणि ॲक्शन दिग्दर्शक शाम कौशल यांच्या मुलाखतींचा समावेश असेल, दरम्यान, हृतिक हा सध्या अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. YRF च्या 'अल्फा' मध्येही त्याचा कॅमिओ असू शकतो. दरम्यान, राकेश रोशन हे 'क्रिश 4' मध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे.

Web Title: The Roshans To Release On 10 January 2025 On Netflix On Hrithik Roshan Birthday Shah Rukh Khan Priyanka Chopra