The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' चा वाद सुरुच, तमिळनाडूत निदर्शने; स्क्रीनिंगवर आणली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 09:12 AM2023-05-08T09:12:57+5:302023-05-08T09:16:40+5:30

'द केरळ स्टोरी' विरोधात काल चेन्नईत निदर्शन झालं.

The Kerala Story: 'The Kerala Story' controversy continues, protests in Tamil Nadu; Screening was banned | The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' चा वाद सुरुच, तमिळनाडूत निदर्शने; स्क्रीनिंगवर आणली बंदी

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' चा वाद सुरुच, तमिळनाडूत निदर्शने; स्क्रीनिंगवर आणली बंदी

googlenewsNext

बॉलिवूड चित्रपट 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) ला होणारा विरोध थांबण्याचं नावंच घेत नाही. काही राज्यांमध्ये फिल्मला पाठिंबा मिळतोय तर काही राज्यांत विरोध होतोय. दरम्यान तमिळनाडूमध्ये चित्रपटाची स्क्रीनिंग थांबवण्यात आली आहे. केरळच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये कायदेशीर व्यवस्था आणि फिल्मला मिळणाऱ्या खराब प्रतिक्रियांचा हवाला देताना स्क्रीनिंग थांबवण्यात आली आहे.

मल्टिप्लेक्स मालकांनी घेतला निर्णय 

'द केरळ स्टोरी' विरोधात काल चेन्नईत निदर्शन झालं.  सिनेमाच्या निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शकाविरोधात तमिलर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्कायवॉक मॉलजवळ विरोध प्रदर्शन केले. हे बघताच सुरक्षेच्या कारणास्तव थिएटर मालकांनी स्क्रीनिंग थांबवली. 

ट्रेलरवरही झाला होता वाद

फिल्मच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला की केरळमधील तब्बल ३२ हजार मुली लव्ह जिहादच्या शिकार झाल्या. यावर प्रचंड वाद झाला. केरळ उच्च न्यायालयात सिनेमावर स्टे यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली. सिनेमाच्या मेकर्सने कोर्टात स्पष्ट केले की सिनेमातून ३२ हजार महिला ISISमध्ये भरती झाल्याचा दावा काढून टाकण्यात येईल. 

Web Title: The Kerala Story: 'The Kerala Story' controversy continues, protests in Tamil Nadu; Screening was banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.