'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल येतोय! कडक सुरक्षेत झालं सिनेमाचं शूट; रिलीज डेटही समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:55 IST2025-12-31T13:54:50+5:302025-12-31T13:55:34+5:30
कधी येणार 'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल?

'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल येतोय! कडक सुरक्षेत झालं सिनेमाचं शूट; रिलीज डेटही समोर
अदा शर्माचा २०२३ साली आलेला 'द केरळ स्टोरी' खूप गाजला. विपुल शाह यांच्या या सिनेमाची जगभरात चर्चा झाली होती. प्रेक्षकांना समाजातलं वास्तव दाखवणारा हा सिनेमा होता. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन असे दोन राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. आता निर्माते विपुल शाह 'द केरळ स्टोरी २' घेऊन येत आहेत. कडक सुरक्षेत या सिनेमाचं शूटिंग झालं आणि येत्या फेब्रुवारी महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे.
'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल लवकरच येत आहे. सिनेमाची गोष्ट पहिल्या भागापेक्षाही जास्त गंभीर असणार आहे. सिनेमात कोण कलाकार असणार हे अजून उघड केलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, 'द केरळ स्टोरी २'चं शूट खूप नियंत्रित आणि सुरक्षित वातावरणात केलं गेलं. शूटिंगवेळी काहीही अडचण येऊ नये असा निर्माते विपुल शाह यांचा प्रयत्न होता."
न्यूज १८ रिपोर्टनुसार, शूटिंगवेळी कास्ट आणि क्रू ला आपला फोनही वापरण्याची परवानगी नव्हती. जेणेकरुन सेटवरुन काहीही लीक होऊ नये. सिनेमाची रिलीज डेट २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल येणार हे समजल्यावर प्रेक्षक आतुर झाले आहेत. पहिल्या भागाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. पहिल्याच दिवशी सिनेमाने ८ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या वीकेंडआधी सिनेमाने १०० कोटींचा बिझनेस केला होता. सिनेमा ४० दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये राहिला. सिनेमाने भारतात एकूण २४१ कोटी तर जगभरात ३०२ कोटींची कमाई केली होती.