लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 15:36 IST2024-05-09T15:36:04+5:302024-05-09T15:36:28+5:30

एपिसोडमध्ये किती धमाल होणार आहे, याची झलक या प्रोमोमध्ये पहायला मिळतेय.

The Great Indian Kapil Show: Sonakshi Sinha's Reply To Kapil Sharma's Wedding Question said... | लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली...

लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली...

कॉमेडियन कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये "हिरामंडी" सीरिजमधील अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत. याचा रंजक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. एपिसोडमध्ये किती धमाल होणार आहे, याची झलक या प्रोमोमध्ये पहायला मिळतेय.  लग्नाबद्दल एक प्रश्न सोनाक्षीला कपिल विचारतो. तेव्हा दबंग गर्लचं उत्तर ऐकून सर्वंच जण हसायला लागतात. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो' या नव्या प्रोमोमध्ये, कपिल शर्मा सोनाक्षी सिन्हाला प्रश्न विचारतो की, 'आलियाने लग्न केलं, कियाराने लग्न केलं, आता तू कधी लग्न करणार आहेस?' कपिलच्या ह्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हा म्हणते, 'तू जखमेवर मीठ चोळतोय का ?' सोनाक्षी सिन्हाच्या या उत्तरावर कपिल शर्मा जोरजोरात हसायला लागतो. यासोबतच सोनाक्षी म्हणते, 'त्याला माहित आहे, मला किती धुमधडाक्यात लग्न करायचे आहे'.ट

'हीरामंडी' या वेबसीरीजमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि  शर्मीन सेगल यांच्यासोबत कपिल शर्माने धमाले केली. कपिलने या अभिनेत्रींना पाणीपुरी पार्टीदेखील दिल्याचं पाहायला मिळतंय. प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक या एपिसोडसाठी उत्सुक असून सर्वच चाहत्यांकडून कलाकारांचे कौतुक केले जात आहे.
 

Web Title: The Great Indian Kapil Show: Sonakshi Sinha's Reply To Kapil Sharma's Wedding Question said...