हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:42 IST2024-08-23T16:42:18+5:302024-08-23T16:42:40+5:30

आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो 2' चा पहिला प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कपिल त्याच्या गैंगसोबत मस्ती करताना दिसत आहे.

The Great Indian Kapil Show Season 2 announced Archana Puran Singh | Kapil Sharma | Netflix | हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवर सुरु झालेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' प्रेक्षकांना खूप आवडला होता. पहिला सीझन संपल्यानंतर चाहते निराश झाले होते. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कपिलच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याची अधिकृत घोषणा झाली आहे. नेटफ्लिक्सने याचा एक प्रोमो शेअर केला आहे.

कपिल शर्मा त्याच्या टीमबरोबर जबरदस्त कमबॅक करत आहे. आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो 2' चा पहिला प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कपिल त्याच्या गैंगसोबत मस्ती करताना दिसत आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडिया अकाउंटवरही हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता शनिवार 'Funnyवार' असेल कारण कपिल आणि त्याची टोळी यावेळी दुहेरी मजा आणि हास्य घेऊन येत आहे".


'द ग्रेट इंडियन कपिल शो' शोमध्ये कपिलसोबत कृष्णा अभिषेक, किकू शारदा, अर्चना पूरण सिंह आणि राजीव ठाकूर हे देखील दिसत आहेत. या शोचा प्रीमियर नेटफ्लिक्सवर होणार आहे. सध्या त्याची रिलीज डेट समोर आलेली नाही. पहिल्या सीझनमध्ये क्रिकेट, संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील बड्या व्यक्तींनी भाग घेतला होता. शोमध्ये आमिर खान, नीतू कपूर, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सारखे मोठे स्टार्स दिसले. कपिलच्या शोमध्ये यापूर्व कधीही न दिसणारा आमिर, शोमध्ये सहभागी झाला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

Web Title: The Great Indian Kapil Show Season 2 announced Archana Puran Singh | Kapil Sharma | Netflix