Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Reception: मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये पार पडलं कियारा-सिद्धार्थचं ग्रँड रिसेप्शन, पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 00:03 IST2023-02-13T00:02:25+5:302023-02-13T00:03:51+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली.

The grand wedding reception of Sidharth Malhotra Kiara Advani held at a 5 star hotel in Mumbai see the first photo | Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Reception: मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये पार पडलं कियारा-सिद्धार्थचं ग्रँड रिसेप्शन, पहिला फोटो आला समोर

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Reception: मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये पार पडलं कियारा-सिद्धार्थचं ग्रँड रिसेप्शन, पहिला फोटो आला समोर

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि अगदी जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत या जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांनी दिल्लीतील सिद्धार्थच्या घरी 'गृह प्रवेश' केला. दिल्लीत मीडियाला मिठाईचे वाटप करताना सिद्धार्थ आणि कियारा एकत्र दिसले होते आणि फोटोंसाठी पोजही दिली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी १२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपली रिसेप्शन पार्टी दिली. यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थितीही लावली.

या नव्या कपलचा रिसेप्शनमधील फोटोही समोर आला आहे. दरम्यान, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी अलीकडेच त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला होता. या जोडप्याच्या केमिस्ट्रीने सर्वांचीच मने जिंकली. 'रांझा'ला लग्नाच्या ट्रॅकमध्ये रूपांतरित करण्याची कियारा अडवाणीची कल्पना होती याचा खुलासाही सिद्धार्थने केला.



या दोघांचे लग्न म्हणजे एक शाही सोहळा असल्याचे आपल्याला त्यांच्या फोटोवरुन पाहायला मिळाले. राजस्थानमधील जैसलमेर याठिकाणी सूर्यगड पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्यानंतर दोघेही दिल्लीला रवाना झाले. लग्नानंतर दिल्ली एअरपोर्टवर आणि सिद्धार्थच्या घराबाहेरचे या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामध्ये कियाराचा नव्या नवरीचा लूक पाहायला मिळाला.

Web Title: The grand wedding reception of Sidharth Malhotra Kiara Advani held at a 5 star hotel in Mumbai see the first photo