'जब वी मेट' साठी पहिली पसंत होती भूमिका चावला तर शाहीदच्या जागी...अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 03:16 PM2023-04-26T15:16:03+5:302023-04-26T15:17:11+5:30

अभिनेत्री भूमिका चावलाने नुकतेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून कमबॅक केले.

The first choice for jab We Met was Bhumika Chawla and bobby deol instead of shahid kapoor | 'जब वी मेट' साठी पहिली पसंत होती भूमिका चावला तर शाहीदच्या जागी...अभिनेत्रीने केला खुलासा

'जब वी मेट' साठी पहिली पसंत होती भूमिका चावला तर शाहीदच्या जागी...अभिनेत्रीने केला खुलासा

googlenewsNext

शाहीद कपूर आणि करिना कपूरचा सुपरहिट सिनेमा 'जब वी मेट' आठवतोय? होय तोच सिनेमा ज्यामुळे करिना कपूरला आजही चाहते गीत म्हणूनच जास्त ओळखतात. मात्र या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी शाहीद आणि करिना हे पहिली पसंती नव्हतेच. 'तेरे नाम' फेम अभिनेत्री भूमिका चावला (Bhumika Chawla) हिला सर्वात आधी 'जब वी मेट' ऑफर झाल्याचा खुलासा तिने केला आहे.

अभिनेत्री भूमिका चावलाने नुकतेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून कमबॅक केले. दरम्यान ती एका मुलाखतीत म्हणाली,'इम्तियाज अली दिग्दर्शित फिल्मचा भाग न झाल्याचं मला कायम दु:ख वाटतं. मी फिल्म साईनही केली होती. माझ्यासोबत बॉबी देओल असणार होता. तसंच सिनेमाचं टायटल जब वी मेट नव्हे तर ट्रेन असं होतं.'

ती पुढे म्हणाली, 'जेव्हा प्रोडक्शन हाऊस बदलले तेव्हा बॉबी ऐवजी शाहीदचे नाव समोर आले. नंतर माझ्या जागी आधी आएशा टाकियाला घेण्यात येणार होतं. मात्र तसं काही झालं नाही. यानंतर मेकर्सने करिना कपूरचं नाव फायनल केलं गेलं. मी या फिल्मसाठी १ वर्ष वाट पाहिली आणि दुसरी कोणतीच फिल्म साईन केली नव्हती. अशा गोष्टी बदलतात पण ठीक आहे चालत राहतं.'

'तेरे नाम' नंतर भूमिकाला अनेक ऑफर्स मिळाल्या पण मी स्क्रीप्ट बाबतीत नेहमीच सिलेक्टिव्ह राहिले. तसंच फिल्म्ससाठी अभिनेत्रींचं वय फार महत्वाचं धरलं जातं. हिरो आजही हिरोच्या भूमिका करतात पण अभिनेत्री मात्र मागे पडतात. इंडस्ट्रीत बदल घडवण्याची गरज आहे.'

Web Title: The first choice for jab We Met was Bhumika Chawla and bobby deol instead of shahid kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.