असे आहे संजूबाबचे भविष्य ! तुम्हीही जाणून घ्या!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 18:54 IST2016-08-03T13:24:57+5:302016-08-03T18:54:57+5:30
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचे आयुष्य म्हणजे सुरुवातीपासूनच अनेक अडचणी, संकटे आणि वादांनी भरलेले राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी संजय ...
.jpg)
असे आहे संजूबाबचे भविष्य ! तुम्हीही जाणून घ्या!!
ब लिवूड अभिनेता संजय दत्त याचे आयुष्य म्हणजे सुरुवातीपासूनच अनेक अडचणी, संकटे आणि वादांनी भरलेले राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी संजय शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला. आता त्याला बॉलिवूडमधील करिअर पुढे न्यायचे आहे. खरे तर संजयकडे अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आहेत. पण संजयला सगळे निर्णय विचारपूर्वक घ्यायचे आहेत. याचे कारण म्हणजे संजय त्याच्या भविष्याप्रति काहीसा चिंतीत आहे. साहजिक भविष्याची चिंता म्हटल्यावर ज्योतिषाकडे धाव घेणे आलेच. संजयने अलीकडे एका नावाजलेल्या ज्योतिषाची भेट घेत स्वत:च्या भविष्याविषयी जाणून घेतले. संजयचा येणारा काळ अतिशय चांगला आहे. करिअरही चांगले आहे, असे या ज्योतिषाने संजयला सांगितले. बिझनेस सुरु करायचा तर तो स्वत:च्या नाही तर पत्नी मान्यताच्या नावावर सुरु करायचा सल्लाही या ज्योतिषाने संजयला दिला. पण यासोबतच ज्योतिषाने संजयला एका गोष्टीबद्दल सावधही केले. होय, मान्यताना भविष्यात आरोग्यविषयक समस्या सतावू शकतात, असे ज्योतिषाने संजयला सांगितले. संजयची चिंता यामुळे वाढली आहे..पण निश्चितपणे यावरही ज्योतिष शास्त्रात उपाय असणार..तेव्हा डोन्ट वरी संजय..!!