Teaser out : ‘कट्टामारायेदु’मध्ये पाहा पॉवर स्टार पवन कल्याणचा अॅक्शन धमाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 21:16 IST2017-02-04T15:37:40+5:302017-02-04T21:16:01+5:30
बहुचर्चित ‘कट्टामारायेदु’ या सिनेमाचे आॅफिशियल टिझर आउट करण्यात आले असून, यामध्ये पॉवर स्टार पवन कल्याणचा जबरदस्त अॅक्शन धमाका बघावयास मिळत आहे

Teaser out : ‘कट्टामारायेदु’मध्ये पाहा पॉवर स्टार पवन कल्याणचा अॅक्शन धमाका
ब ुचर्चित ‘कट्टामारायेदु’ या सिनेमाचे आॅफिशियल टिझर आउट करण्यात आले असून, यामध्ये पॉवर स्टार पवन कल्याणचा जबरदस्त अॅक्शन धमाका बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी प्रचंड कुतुहलता निर्माण झाली होती, टिझरमध्ये ज्या पद्धतीने पवन कल्याणचा जलवा दाखविण्यात आला आहे, त्यावरून तो प्रेक्षकांना भावणार नसेल तरच नवल...
किशोरकुमार परदासनी यांनी दिग्दर्शित केलेला तामिळपट ‘कट्टामारायेदु’ या सिनेमात पॉवर स्टार पवन कल्याण हा हटके अंदाजात झळकणार असल्याने त्याच्या फॅन्सला या सिनेमाची जबरदस्त आतुरता आहे. सिनेमात पवन कल्याणसोबत अभिनेत्री श्रृती हासनही झळकणार असल्याने दोघांची जोडी या सिनेमात जबरदस्त कमबॅक करेल, असे अंदाज वर्तविले जात आहेत.
आता या सिनेमाचा आॅफिशियल टिझर आउट करण्यात आल्याने सिनेमाची पहिली झलक बघण्यासाठी पवन कल्याण याच्या फॅन्सनी यू-ट्यूबवर एकच गर्दी केली आहे. ५० सेकंदांच्या या टिझरमध्ये पवन कल्याण धोती-कुर्ता या अवतारात गुडांची पिटाई करताना बघावयास मिळत आहे. मात्र टिझरमध्ये श्रृती हासनची एकही झलक बघावयास मिळाली नसल्याने फॅन्सना सिनेमाविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सिनेमात पवन कल्याण याच्याबरोबर श्रृती हासन, शिवा बालाजी, कमल कमाराजू, चैतन्य क्रिष्णा आणि तरुण अरोरा ही स्टारकास्ट आहे. सिनेमाची शुटिंग संपली असून, २९ मार्च रोजी सिनेमा रिलिज होणार आहे. सिनेमाची निर्मिती शर्रथ मरार यांनी केली असून, संगीत अनूप रूबेन्स यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पवन कल्याण याच्या राजकीय वाटचालीविषयी चर्चा रंगली होती. अशाच काहीशा अवतारात तो सिनेमात झळकणार असल्याने फॅन्सला हा सिनेमाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
![]()