'केजीएफ २'च्या टीझरला २४ तासांत मिळाले इतके व्ह्युज, इमोशनल झाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 13:22 IST2021-01-09T13:22:27+5:302021-01-09T13:22:54+5:30

पाहता पाहता 'केजीएफ २'च्या टीझरला मिळणारे प्रेम पाहून अभिनेता यश खूप भावूक झाला आहे.

The teaser of 'KGF 2' got so many views and emotional success in 24 hours | 'केजीएफ २'च्या टीझरला २४ तासांत मिळाले इतके व्ह्युज, इमोशनल झाला यश

'केजीएफ २'च्या टीझरला २४ तासांत मिळाले इतके व्ह्युज, इमोशनल झाला यश

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर 'केजीएफ २'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुन्हा एकदा टशनमध्ये दिसलेल्या रॉकी भाईने लोकांचे मन जिंकले आहे. पाहता पाहता 'केजीएफ २'ला १०० कोटी व्ह्युजच्या जवळपास पोहचला आहे. प्रेक्षकांचे प्रेम पाहून कन्नड सुपरस्टार यश खूप भावूक झाला आहे.

देशभरात 'केजीएफ २' चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशात अभिनेता यशच्या ३५व्या वाढदिवसानिमित्ताने ८ जानेवारी रोजी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची योजना होती. मात्र चाहत्यांच्या वाढत्या मागणीनुसार शेवटच्या क्षणी निर्णय बदलून यशच्या वाढदिवसाच्या एक दिवसाआधी टीझर रिलीज केला गेला. आता २४ तासात या टीझरला ७८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ही माहिती खुद्द यशने ट्विटरवर दिली आहे. यशच्या ट्विटनंतर या टीझरचे व्ह्युज वाढत चालले आहेत. टीझर रिलीज होऊन ३४ तास उलटले आहेत आणि याचे व्ह्युज ८६ मिलियनपर्यंत पोहचले आहेत.


हा आनंद जाहिर करत आणि आपल्या प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी यशने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्याने पोस्टर शेअर करत लिहिले की, माझ्यासाठी तुमचे प्रेम आज माझ्यासाठी खूप चांगला दिवस आहे. थँक यू लव्ह यू ऑल.


'केजीएफ'चा पहिला भाग २०१८ साली रिलीज झाला होता. हा चित्रपट कन्नड, तमीळ, तेलगू आणि हिंदीत रिलीज झाला होता आणि या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड केले. हा चित्रपट पहिला कन्नडमध्ये आला होता ज्याने २५० कोटींहून जास्त कमाई केली होती. त्यांनतर हिंदीतही डब केला ज्याने सर्वात जास्त कमाई केली होती.


'केजीएफ २'मध्ये यश शिवाय संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राजसोबत बरेच कलाकार यात पहायला मिळणार आहेत. 'केजीएफ २'च्या टीझरमध्ये रॉकीची आई आणि त्याचे बालपण दाखवले गेले आहे. रॉकीच्या आईने त्याचे कसे पालन पोषण केले, मग मोठे झाल्याचा कारकीर्द आणि आईला दिलेले वचन दाखवले गेले आहे. हे वचन रॉकी चित्रपटात पूर्ण करताना दिसणार आहे. टीझरमध्ये नेत्याच्या भूमिकेत रवीना टंडन दिसते आहे तर संजय दत्त अधीराच्या लूकमध्ये दिसतो आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते उत्सुकतेने चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

Web Title: The teaser of 'KGF 2' got so many views and emotional success in 24 hours