‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, करिनाशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:08 PM2019-12-16T16:08:17+5:302019-12-16T16:13:57+5:30

जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री?

tara sutaria confesses her love for alleged boyfriend aadar jain | ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, करिनाशी आहे कनेक्शन

‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, करिनाशी आहे कनेक्शन

googlenewsNext
ठळक मुद्देताराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे तिचा ‘मरजावां’ हा सिनेमा रिलीज झाला.

तारा सुतारिया आता बॉलिवूडची स्टार आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी तारा पहिल्याच चित्रपटानंतर चर्चेत आली. पण या चर्चेचे कारण म्हणजे, लव्ह रिलेशनशिप. होय, गेल्या अनेक दिवसांपासून तारा आणि करिना कपूरचा चुलत भाऊ आदर जैन या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. तारा व आदर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. साहजिकच यानंतर तारा व आदर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आदरचा मोठा भाऊ अरमान जैन याच्या रोका सेरेमनीत तारा दिसली आणि या चर्चांना आणखी बळ मिळाले. आता तर ताराने जाहिरपणे या प्रेमाची कबुली दिली आहे.


होय, आदरने अलीकडे मुंबईतील ‘युटू’ या आयरिश बँडच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ शेअर केला. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ताराला टॅग केले. इतकेच नाही तर ‘जेव्हा मी तुझ्या सोबत असतो...,’असेही लिहिले. मग काय, तारानेही ‘नेहमी तुझ्यासोबत...’असे लिहित आदरचा हा व्हिडीओ लगेच रिशेअर केला. त्यांच्या या शेअर-रिशेअरवरून तारा व आदरने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्याचे मानले जात आहे.


यापूर्वी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तारा आदरबद्दल बोलली होती. आम्ही एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करतो, असे तारा या मुलाखतीत म्हणाली होती. 

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे तिचा ‘मरजावां’ हा सिनेमा रिलीज झाला. यानंतर ती ‘तडप’ या सिनेमात दिसणार आहे. हा चित्रपट साऊथ सिनेमा ‘आरएक्स 100’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूड डेब्यू करतोय.

Web Title: tara sutaria confesses her love for alleged boyfriend aadar jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.