राखी सावंतविरोधात तनुश्री दत्ताची पोलिसांत धाव, दाखल केला FIR, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:32 IST2023-10-13T11:32:18+5:302023-10-13T11:32:38+5:30

राखीने मानसिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. आता तनुश्रीने राखीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राखी सावंतविरोधात तनुश्रीने मुंबईतील ओशिवारा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. 

Tanushree Dutta filed FIR against Rakhi Sawant said she has mentally tortured me | राखी सावंतविरोधात तनुश्री दत्ताची पोलिसांत धाव, दाखल केला FIR, नेमकं प्रकरण काय?

राखी सावंतविरोधात तनुश्री दत्ताची पोलिसांत धाव, दाखल केला FIR, नेमकं प्रकरण काय?

'आशिक बनाया आपने' फेम तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या तनुश्रीने काही दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेत राखी सावंतवर अनेक गंभीर आरोप केले होते. राखीने मानसिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. आता तनुश्रीने राखीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राखी सावंतविरोधात तनुश्रीने मुंबईतील ओशिवारा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. 

तनुश्रीने याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "मी इथे राखी सावंतविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आली आहे. तिने २०१८ साली मीटू आंदोलनावेळी मला खूप त्रास दिला होता. आता पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. मी गेल्या पाच वर्षांत अनेक पुरावे जमा केले आहेत. पोलीस याबाबत योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे." 

राखीवर तनुश्रीने पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. "एका गाण्यातून राखी सावंतला काढून टाकण्यात आलं होतं. त्या गाण्याची ऑफर मला देण्यात आली होती. या गोष्टीवरुन राखीने वाद निर्माण केला. त्यामुळे पुन्हा निर्मात्यांनी राखीला या गाण्यात घेतलं," असं तनुश्री म्हणाली. राखीने निर्मात्यांबरोबर मिळून मु्द्दाम हे सगळं केलं होतं, असंही तनुश्रीने सांगितलं. पण हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नसल्याचा खुलासाही तनुश्रीने केला. 

Web Title: Tanushree Dutta filed FIR against Rakhi Sawant said she has mentally tortured me