"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
By कोमल खांबे | Updated: November 23, 2025 13:47 IST2025-11-23T13:47:26+5:302025-11-23T13:47:57+5:30
२००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी या सिनेमातील 'आशिक बनाया आपने' गाण्याबाबत तनुश्रीने वक्तव्य केलं आहे.

"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
तनुश्री दत्ता एकेकाळी बॉलिवूडची स्टार अभिनेत्री होती. 'आशिक बनाया आपने' या गाण्याने तिला रातोरात स्टार केलं. या गाण्यात तनुश्रीने इमरान हाशमीसोबत इंटिमेट सीन दिले होते. हे गाणं प्रचंड व्हायरलही झालं होतं. 'आशिक बनाया आपने' गाण्यामुळे तनुश्री प्रसिद्धीझोतात आली होती. २००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी या सिनेमातील 'आशिक बनाया आपने' गाण्याबाबत तनुश्रीने वक्तव्य केलं आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली, "तेव्हा तर मी फार विचार केला नव्हता. कारण तेव्हा मी फक्त २० वर्षांचे होते. मी मिस युनिव्हर्स स्पर्धेतून नुकतीच परत आले होते. मिस युनिव्हर्सच्या स्टेजवर तर मी बिकिनी घातली होती. तेव्हा मी १८-१९ वर्षांची असेन. मी फूल टू पीस बिकिनी घातली होती. आशिक बनाया आपनेमध्ये तर मी पूर्ण कपडे घातले आहेत. म्हणजे बिकिनीचा विचार केला तर मी खूप कपडे घातले आहेत. ते इंटिमेट सीन प्रोफेशनल होते. अनेक मोठमोठे कलाकारही इंटिमेट सीन देतात".
"एवढा मोठा हंगामा होईल असं मला वाटलं नव्हतं. गाणं चांगलं होतं म्हणून हिट झालं. आणि त्याचं शूटिंग चांगलं केलं होतं. जेव्हा मी लोकांच्या रिअॅक्शन पाहिल्या तेव्हा मला जाणवलं की अरे हे थोडं जास्त नाही झालं का... पण शूटिंग करताना मला एक ऑकर्वडनेस होती. एखाद्या व्यक्तीसोबत पर पुरुषासोबत रिलेशन नसताना असे इंटिमेट सीन देताना प्रत्येक अभिनेत्रीला असंच वाटतं. अभिनेतेही थोडे ऑकवर्डच असतात. ते गाणं करताना माझ्या डोक्यात तर कोणतेच वाईट विचार नव्हते", असंही पुढे ती म्हणाली.