‘तान्हाजी’ सुसाट...;  26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता मोडला या चित्रपटाचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 11:10 IST2020-02-06T11:08:56+5:302020-02-06T11:10:21+5:30

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. हेच कारण आहे की, अनेक चित्रपटांचे आव्हान असूनही चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे.

tanhaji the unsung warrior new record on the 26th day broke baahubali 2 record |   ‘तान्हाजी’ सुसाट...;  26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता मोडला या चित्रपटाचा विक्रम

  ‘तान्हाजी’ सुसाट...;  26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता मोडला या चित्रपटाचा विक्रम

ठळक मुद्दे‘तान्हाजी’मध्ये अजय देवगणने नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.  

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. हेच कारण आहे की, अनेक चित्रपटांचे आव्हान असूनही चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे.  अलीकडे रिलीज झालेले ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’,‘पंगा’, ‘जवानी जानेमन’ हे सिनेमेही ‘तान्हाजी’ची घोडदौड थांबवू शकले नाहीत. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत, या चित्रपटाने एकापाठोपाठ एक नवनवे विक्रम रचण्याचा धडाका लावला आहे. कमाईच्या बाबतीत ‘तान्हाजी’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. आता तर या चित्रपटाने ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्डही तोडला आहे. होय, 26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता ‘तान्हाजी’ने ‘बाहुबली 2’ने रचलेला विक्रम मोडीत काढला.


26 व्या दिवसापर्यंत ‘बाहुबली 2’ला 0.13  कोटींचे आगाऊ बुकिंग मिळाले होते. आता 26 व्या दिवशी ‘तान्हाजी’ला 0.18 कोटींचे आगाऊ बुकिंग मिळाले आहे. हा एक विक्रम आहे. ‘तान्हाजी’ने आत्तापर्यंत भारतात सुमारे 257 कोटींची कमाई केली आहे.
गत मंगळवारी 26 व्या दिवशी ‘तान्हाजी’ने 2.05 कोटींची कमाई केली. 27 व्या दिवसांचा अधिकृत आकडा अद्याप यायचा आहे. पण या दिवसाची कमाईही 2 ते 3 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. 


‘तान्हाजी’ने फक्त मुंबईत 130 कोटी रूपये कमावले आहेत. यापूर्वी सलमानच्या ‘दबंग’ने मुंबईत 104 कोटींचा गल्ला जमवला होता. म्हणजेच ‘तान्हाजी’ने सलमानच्या ‘दबंग’चाही विक्रम मोडला आहे. ही घोडदौड बघता येत्या काही दिवसांत ‘तान्हाजी’ने 300 कोटींचा आकडा पार केला तर आश्चर्य वाटायला नको. ‘तान्हाजी’मध्ये अजय देवगणने नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.  

Web Title: tanhaji the unsung warrior new record on the 26th day broke baahubali 2 record