Vishal Accident VIDEO : काही सेकंदांचा फरक आणि इंचांचं अंतर..., थोडक्यात बचावला साऊथ स्टार विशाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 02:19 PM2023-02-23T14:19:38+5:302023-02-23T14:21:51+5:30

Vishal Accident VIDEO : ‘मार्क अँटनी’ चित्रपटाच्या सेटवरचा हा व्हिडीओ बघून तुमच्याही अंगावर काटा येईल...

tamil actor Vishal Krishna Reddy near death accident on sets of mark antony | Vishal Accident VIDEO : काही सेकंदांचा फरक आणि इंचांचं अंतर..., थोडक्यात बचावला साऊथ स्टार विशाल

Vishal Accident VIDEO : काही सेकंदांचा फरक आणि इंचांचं अंतर..., थोडक्यात बचावला साऊथ स्टार विशाल

googlenewsNext

चित्रपटाच्या सेटवर अनेक अपघात घडतात, कलाकार जखमी होतात. अशाच एका अपघातातून तामिळ स्टार व निर्माता विशाल कृष्ण रेड्डी (Vishal Krishna Reddy) बालंबाल बचावला. होय, विशालने या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. विशाल त्याच्या आगामी ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता, त्यावेळी सेटवर मोठा अपघात घडता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून विशाल बचावला. जे काही घडलं ते बघून विशालही हादरला. क्षणभर सुन्न झाला. सध्या जीव वाचल्याबद्दल विशाल देवाचे आभार मानतोय. त्या काही सेकंदांचा काय घडलं, त्याचा एक व्हिडीओ विशालने सोशल मीडियावर शेअर करत आणि देवाचे आभार मानले आहेत.  

मार्क अँटनीच्या शूटिंगदरम्यान सेटवर कास्ट आणि क्रूची मोठी गर्दी होती. एका महत्त्वाच्या ॲक्शन सीन शूट होत होता. या ॲक्शन सध्मध्ये ट्रकचाही वापर होणार होता. मात्र अचानक ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्रक वेगाने पुढे निघाला.  एक ज्युनिअर आर्टिस्ट शॉटसाठी उभा होता आणि त्याच्यासोबत विशालसुद्धा होता. सीननुसार, ट्रकला एका भिंतीला तोडून पुढे थांबायचं होतं. मात्र ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो सुसाट पुढे निघाला. हे पाहून सेटवर एकच पळापळ झाली. याच घटनेत विशाल बालंबाल बचावला. काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रकचालकाचं नियंत्रण सुटल्याची माहिती तूर्तास समोर येत आहे.


 
‘फक्त काही सेकंदांचा फरक आणि इंचांच्या अंतराने माझा जीव वाचला. मी देवाचे आभार मानतो. या घटनेनंतर मी सुन्न झालो होतो. मात्र आता ठीक आहे आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे’, असं त्याने या घटनेचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे. 

विशाल त्याच्या चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन सीनसाठी ओळखला जातो. त्याचं फिल्म फॅक्ट्री नावाचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस  आहे. विशाल हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते जीके रेड्डी यांचा मुलगा आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या विशालने 2004 मध्ये ॲक्टिंग डेब्यू केला होता.

Web Title: tamil actor Vishal Krishna Reddy near death accident on sets of mark antony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood