तमन्ना भाटियासाठी प्रभास करणार ‘हे’ काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 10:13 IST2017-06-28T04:43:07+5:302017-06-28T10:13:07+5:30
‘साहो’चा टीजर रिलीज झाला अगदी तेव्हापासून या चित्रपटात ‘बाहुबली’ प्रभाससोबत कोण अभिनेत्री दिसणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. या उत्सुकतेसोबतच ...

तमन्ना भाटियासाठी प्रभास करणार ‘हे’ काम!
‘ ाहो’चा टीजर रिलीज झाला अगदी तेव्हापासून या चित्रपटात ‘बाहुबली’ प्रभाससोबत कोण अभिनेत्री दिसणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. या उत्सुकतेसोबतच या चित्रपटात प्रभाससोबत ‘देवसेना’अनुष्का शेट्टीची वर्णी लागेल, अशीही बातमी आहे. या बातमीत किती सत्यता आहे, हे तूर्तास सांगता येणार नाही. कारण मेकर्सनी अद्यापही ‘साहो’मधील अभिनेत्रीची घोषणा केलेली नाही. मेकर्स याबाबतची घोषणा करत नाही, तोपर्यंत प्रभासच्या अपोझिट कोणती हिरोईन दिसणार, हे निश्चित सांगता येणार नाही. पण आता प्रभासबद्दल आम्ही तुमच्यासाठी एक धमाकेदार बातमी घेऊन आलो आहोत.
होय,‘साहो’मध्ये अनुष्का व प्रभासची जोडी दिसणार, अशी खबर असताना दुसरीकडे प्रभास त्याची को-स्टार तमन्ना भाटियासोबत पुन्हा एकदा दिसणार, अशीही खबर आहे. सूत्रांचे खरे मानाल तर प्रभास हा तमन्ना व प्रभुदेवाचा आगामी चित्रपट ‘खामोशी’मध्ये कॅमिओ करताना दिसू शकतो. तमन्ना व प्रभास दोघेही चांगले मित्र आहेत आणि मित्रांसाठी प्रभास काहीही करायला तत्पर असतो. त्यामुळे ‘खामोशी’मधील प्रभासचा कॅमिओ प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज असणार आहे. अर्थात याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘खामोशी’च्या निर्मात्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी ‘नो कमेंट्स’ म्हणून यावर बोलणे टाळले.
ALSO READ : ‘बाहुबली’ गर्ल तमन्ना भाटियाबद्दलचे हे ‘सत्य’ तुम्हाला माहित आहे का?
२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली : दी बिगिनिंग’मध्ये तमन्ना भाटिया फिमेल लीडमध्ये दिसली होती. महेन्द्र बाहुबलीची भूमिका साकारणाºया प्रभासच्या अपोझिट तिला कास्ट करण्यात आले होते. या चित्रपटाने तमन्नाला एक वेगळीच ओळख दिली. यानंतर ‘बाहुबली२’मध्येही ती दिसली. ‘बाहुबली२’कडूनही तमन्नाला मोठी अपेक्षा होत्या. पण प्रत्यक्षात ‘बाहुबली२’ रिलीज झाला अन् तिची घोर निराशा झाली होती. कारण कायमेक्सच्या काही मिनिटांच्या रोलमध्येच ती दिसली. दिग्दर्शक राजमौली यांनी तमन्नाच्या भूमिकेला कात्री लावल्याचे नंतर कळले होते. राजमौली व तमन्नाचे काहीसे बिनसल्यामुळे तिचा रोल कापण्यात आल्याची चचार्ही यानंतर रंगली होती.