चाहतीच्या 'त्या' कृत्यामुळे तमन्नावर आली रडायची वेळ; पाहा नेमकं काय झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 05:52 PM2023-06-27T17:52:29+5:302023-06-27T17:53:06+5:30

Tamannaah bhatia: चाहतीला पाहिल्यावर तमन्नाला रडू कोसळलं

tamannaah fan with her face tattooed tamannaah bhatia get emotional video viral | चाहतीच्या 'त्या' कृत्यामुळे तमन्नावर आली रडायची वेळ; पाहा नेमकं काय झालं

चाहतीच्या 'त्या' कृत्यामुळे तमन्नावर आली रडायची वेळ; पाहा नेमकं काय झालं

googlenewsNext

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamannaah bhatia)  सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. तमन्ना सध्या तिच्या लस्ट स्टोरीज 2 चं जोरदार प्रमोशन करत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती चाहत्यांच्या भेटी घेत आहे. मात्र, एका ठिकाणी चाहतीने तिला जबर धक्का दिला असून तिला सगळ्यांसमोर रडू कोसळलं आहे. तमन्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलिकडेच तमन्ना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. तमन्नाला पाहिल्यावर चाहत्यांनी तिच्या भोवती घोळका केला. यात तिच्या एका चाहतीला पाहून तमन्नाला रडू कोसळलं.

नेमकं काय घडलं प्रकरण?

तमन्नाला पाहिल्यानंतर तिची एक चाहती तिला भेटण्यासाठी आली. या चाहतीने तमन्नासाठी फुलांचा पुष्पगुच्छ, गिफ्ट्स खरेदी केले होते.  हे गिफ्ट्स तिने तमन्नाला दिल्यानंतर तिने चक्क अभिनेत्रीचे पाय धरले. इतकंच नाही तर तिने तिच्या हातावर तमन्नाचा टॅटू काढला असून त्यावर आय लव तमन्ना असं लिहिलं आहे. चाहतीचं असलेलं हेच प्रेम पाहून तमन्ना भारावून गेली आणि तिला रडायला आलं.

दरम्यान, तमन्ना लवकरच Netflix वर लस्ट स्टोरीज 2 मध्ये दिसणार आहे. तसंच ती 'भोला शंकर' या चित्रपटातही झळकणार आहे. याशिवाय सध्या ती बांद्रा आणि जेलर या सिनेमाचं शुटिंग करत आहे.
 

Web Title: tamannaah fan with her face tattooed tamannaah bhatia get emotional video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.