तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:14 AM2024-04-25T11:14:55+5:302024-04-25T11:16:39+5:30

29 एप्रिल रोजी तमन्नाला महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत.

Tamannaah Bhatia Summoned from Maharashtra Cyber Cell in connection with IPL | तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन

तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन

अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) महाराष्ट्र सायबर सेलने समन्स पाठवलं आहे. आयपीएल 2023 मध्ये अवैध स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या अवैध स्ट्रीमिंगमुळे वायाकॉमचं कोटींचं नुकसान झालं आहे. 29 एप्रिल रोजी तमन्नाला महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. 

फेअरप्ले ॲपवर आयपीएल 2023 च्या सामन्यांचं अवैधरित्या प्रसारण केल्यासंबंधी अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत सापडली आहे. याआधी अभिनेता संजय दत्तलाही याचप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने 23 एप्रिल रोजीच हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तो भारतात नसल्याने त्याने स्टेटमेंट रेकॉर्ड करुन पाठवण्याची विनंती केली. आता तमन्ना भाटियाही याप्रकरणात अडकली आहे. एएनआयने यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. 2022 मध्ये वायकॉम 18 ने 2023 ते 2027 पर्यंतच्या आयपीएल सीझनचे डिजीटल अधिकार घेतले. द क्विंटच्या रिपोर्टनुसार, यासाठी कंपनीने सुमारे 23758 कोटींमध्ये डील केली. यासोबतच नेटवर्क 18 ने WPL साठीही ग्लोबल मीडिया राइट्स 951 कोटींना खरेदी केले. 

Web Title: Tamannaah Bhatia Summoned from Maharashtra Cyber Cell in connection with IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.