तमन्ना भाटियाला कलाविश्वात १९ वर्षे पूर्ण, मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:07 PM2024-03-04T22:07:05+5:302024-03-04T22:07:31+5:30

Tamannaah Bhatia : पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने फिल्म इंडस्ट्रीत १९ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली आहे.

Tamannaah Bhatia completes 19 years in the art world, thanks to her fans | तमन्ना भाटियाला कलाविश्वात १९ वर्षे पूर्ण, मानले चाहत्यांचे आभार

तमन्ना भाटियाला कलाविश्वात १९ वर्षे पूर्ण, मानले चाहत्यांचे आभार

पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia)ने फिल्म इंडस्ट्रीत १९ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली आहे. तमन्ना हिने २००५ मध्ये बॉलिवूड चित्रपट 'चांद सा रोशन चेहरा' मधून अभिनयात पदार्पण केले परंतु ती दक्षिण चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री  बनली. एसएस राजामौली यांच्या मॅग्नम ओपस 'बाहुबली: द बिगिनिंग'मध्ये तिने अवंतिका साकारलेली तिची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. पुढे जाऊन तिने 'बबली बाउंसर', 'लस्ट स्टोरीज २' आणि इतर प्रकल्पांसह तिची बहुमुखी प्रतिभा दाखवली. 

2023 मध्ये, तमन्नाने चिरंजीवी-स्टारर 'भोला शंकर' सह बॉक्स ऑफिसवर राज्य केले तर रजनीकांत-स्टारर 'जेलर' मधील तिच्या 'कावला' गाण्यावर लोकांना थिरकायला लावले आणि 'बांद्रा' मधून तिचे मल्याळम इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिची खास मैत्रीण काजल अग्रवाल हिने तमन्नाला सिनेमात जवळपास दोन दशके पूर्ण केल्याबद्दल तिचं कौतुक करून तिला खास शुभेच्छा दिल्या. यावर तमन्ना म्हणाली "खूप खूप धन्यवाद काजू, तुझा अतुलनीय पाठिंबा आणि प्रेम इतक्या वर्षांमध्ये मला कायम प्रोत्साहन देत राहील" 

चाहत्यांना उद्देशून तमन्नाने लिहिले की, "माझ्या सर्व कामासाठी तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे असता आणि तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे. मी तुम्हाला आवडतील असे सिनेमे बनवत राहण्याचे वचन देते आणि हा प्रवास तुमच्या प्रेमाने कायम सुरू राहू दे ही इच्छा व्यक्त करते "

वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तमन्ना भाटिया ‘ओडेला २’ मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे जॉन अब्राहमसोबत वेदा आणि तमिळ चित्रपट अरनमानाई ४ देखील  आहे.

Web Title: Tamannaah Bhatia completes 19 years in the art world, thanks to her fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.