मैत्री आणि प्रेमावर भाष्य करणार तमन्ना भाटियाच्या 'जी करद'चा ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 19:14 IST2023-06-09T19:08:43+5:302023-06-09T19:14:31+5:30
"जी करदा" या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून यात तमन्ना वेगळ्या भूमिका बघायला मिळणार आहे.

मैत्री आणि प्रेमावर भाष्य करणार तमन्ना भाटियाच्या 'जी करद'चा ट्रेलर आऊट
अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamnnaah Bhatia)ची आगामी वेबसीरिज 'जी करदा'चा वर्ल्ड प्रीमियर जाहीर झाला आहे. Amazon Original Series 'Je Karda' ही एक रोमान्स ड्रामा आहे. ही सीरिज बालपणीच्या सात मित्रांभोवती फिरते ज्यांना त्यांच्या ३०व्या वर्षी आपण विचार केला तसे जीवन नाही हे लक्षात येते. "जी करदा" या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून यात तमन्ना वेगळ्या भूमिका बघायला मिळणार आहे. या सीरिजच शूट सुरू झाल्यापासून तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सगळयांना खूप उत्सुकता होती. अखेर हो उत्सुकता संपली असून याचा ट्रेलर लाँच झाला आहे.
तमन्ना तिच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाली, "जी करदा" हा असा एक अनुभव आहे जो मी शब्दात सांगू शकत नाही. मी एक मुंबईची मुलगी आहे आणि म्हणून ही कथा मी स्वतःला रीलेट करू शकले. ही भूमिका मी खूप एन्जॉय केली आणि म्हणून ही भूमिका मी खऱ्या अर्थाने जगले"
जी करदाची कथा बालपणीच्या सात मित्रांभोवती फिरते. ज्यांनी विचार केला होता जेव्हा ते ३० वर्षांचे होतील, तेव्हा त्यांचं जीवन सुरळीत असेल. पण वयाच्या तिशीत त्यांना समजते की आपण विचार केला तसे झाले आहे. यात अनेक समस्या आहेत. ते जिंकतात, प्रेम करतात, हसतात, एकत्र चुका करतात, त्यांनी मनं तुटतात पण या सगळ्यातून त्यांना समजते की त्यांच्याकडे चांगले मित्र आहेत.
अरुणिमा शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, हुसैन दलाल, अब्बास दलाल लिखित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित, आठ भागाचा हा वेब शो नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. भारतासह जगभरातील २४० देशांमध्ये या मालिकेचा प्रीमियर होणार आहे. 'जी करदा'चा वर्ल्ड प्रीमियर १५ जून २०२३ रोजी होणार आहे.