'यूँ ही नहीं' गाण्यातून दिसून येणार कुणाल रॉय कपूरचा आशिकी अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 11:28 IST2019-08-05T11:26:02+5:302019-08-05T11:28:54+5:30

नाझिया आणि कुणाल दोघे सह-कलाकार म्हणून अत्यंत चांगली केमिस्ट्री होती आणि यासाठी लोकांनी त्यांचे कौतुकही केले ह्या सर्व कारणामुळे हे गाणे रुईयाच्या कल्पनेनुसार चित्रित केले जाऊ शकले.

Talented Kunaal Roy Kapur Turns Aashiq with Mushkil - Fear Behind You's 'Yun Hi Nahin' Number | 'यूँ ही नहीं' गाण्यातून दिसून येणार कुणाल रॉय कपूरचा आशिकी अंदाज!

'यूँ ही नहीं' गाण्यातून दिसून येणार कुणाल रॉय कपूरचा आशिकी अंदाज!

अभिनेता कुणाल रॉय कपूरने 'देल्ही बेली', 'नौटंकी साला' आणि 'ये जवानी हैं दीवानी' सारख्या सुपरहीट चित्रपटात विनोदी अभिनयाने सा-यांची पसंती मिळवली. आता तो पुन्हा एकदा आव्हानात्मक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शक राजीव एस रुईया आणि निर्माता रविंदर जीत दारिया यांचा आगामी चित्रपट 'मुश्किल-फीयर बिहाइंड यु' मध्ये रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे कुणाल, अभिनेता संजय दत्त यांची भाची नाझिया बरोबर ग्रीसच्या सुंदर परिसरात रोमांस करताना पाहायला मिळणार आहे.  

दिग्दर्शक राजीव एस रुईया यांना कुणाल रोमँटिक गाण्यास संमती देईल की नाही याबद्दल खात्री नव्हती, शायराना अंदाजमध्ये  लिहिलेले हे गाणे संगीतकार वरदान सिंग यांनी संगीतबद्ध केलं आहे. कुणाल फक्त गाण्यानेच मंत्रमुग्ध झाले नव्हते तर अंजन सागरी यांचे बोल त्यांना  फार आवडले होते. ह्या गाण्याबद्दल सांगताना कुणालने सांगितले की, “मला आधी भीती वाटत होती कारण आजवर मी विनोदी भूमिका पार पाडत आलो आहे आणि हे गाणे रोमँटिक होते. पण जेव्हा मी गाणे ऐकले तेव्हा मी ठरवले की दिग्दर्शक राजीव एस रुईया यांचा माझ्यावर असलेल्या विश्वासासाठी मी प्रयत्न केलेच पाहिजेत."

नाझिया आणि कुणाल दोघे  सह-कलाकार म्हणून अत्यंत चांगली केमिस्ट्री होती आणि यासाठी लोकांनी त्यांचे  कौतुकही केले ह्या सर्व कारणामुळे हे गाणे रुईयाच्या कल्पनेनुसार चित्रित केले जाऊ शकले. गाण्याच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणींबद्दल सांगताना कुणालने सांगतो की,  “नाझियासाठी हे सोपे काम नव्हते. मी सूटमध्ये असताना तिला ग्लॅमरस आउटफिट्समध्ये अत्यंत थंडीत शूट करावे लागले होते. ” शूटच्या दरम्यान म्हणजे सीन झाल्यावर, युनिट मला गालिच्यांनी झाकण्यासाठी धावत असत.”

 

राजीव एस रुईया म्हणाले, “शेवटच्या सीनमध्ये नाझिया पडली आणि आम्हाला घाई करावी लागली, तिला उचलून घ्यावं आणि तिची काळजी घ्यावी लागली. नाझिया आणि कुणाल दोघेही उत्तम अभिनय करत होते आणि त्यामुळे ग्रीसमधील व्हर्जिन लोकलमध्ये ह्या गाण्याचे चित्रीकरण अतिशय उत्तमरित्या पार पडले आहे. या चित्रपटानंतर मला खात्री आहे की कुणालकडे बरेच रोमँटिक चित्रपट येतील." 

 

या भूमिकेत राजीवने कुणालचाच का विचार केला? ह्यावर उत्तर देत ते म्हणतात की, “मी त्याला एका हॉरर चित्रपटासाठी कास्ट केले होते. हॉरर शैलीमध्ये गाणी पेपी असू शकत नाहीत, मग रोमँटिक गाणे हे. कुणाल ह्या गाण्यामध्ये आनंददायक दिसले आणि ते अत्यंत गाण्याला साजेल असे  तसेच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल असा विश्वास दोघांनी व्यक्त केले आहे. 

Web Title: Talented Kunaal Roy Kapur Turns Aashiq with Mushkil - Fear Behind You's 'Yun Hi Nahin' Number