तर मम्मी पप्पांसोबत न्यू ईअरची पार्टी करतोय छोटा नवाब तैमूर, पाहा हे पार्टीतले क्यूट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:21 IST2019-01-04T13:15:37+5:302019-01-04T13:21:18+5:30
सध्या तैमूर अली खान आपल्या आई-वडिलांसोबत स्वित्झर्लंडमध्ये न्यू ईअरचे सेलिब्रेशन करतोय. करीना कपूर आणि सैफ अली खानसोबतचा स्वित्झर्लंडमधला तैमूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे

तर मम्मी पप्पांसोबत न्यू ईअरची पार्टी करतोय छोटा नवाब तैमूर, पाहा हे पार्टीतले क्यूट फोटो
सध्या तैमूर अली खान आपल्या आई-वडिलांसोबत स्वित्झर्लंडमध्ये न्यू ईअरचे सेलिब्रेशन करतोय. करीना कपूर आणि सैफ अली खानसोबतचा स्वित्झर्लंडमधला तैमूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो पार्टीमधला आहे. त्यामुळे तैमूर सैफ आणि करिनासोबत पार्टी एन्जॉय करतो. सैफ अली खानच्या खांदावर बसलेला तैमूर आनंदात दिसतोय. गेल्या वर्षीदेखील तैमूर न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच तैमूर वाढदिवस आपला दुसरा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात गेला होता.
काही दिवसांपूर्वीच तैमूर डॉल बाजारात आली. हा बाहुला केरळच्या एका स्टोर्समध्ये विकल्या जात असल्याचेसमोर आले होते. पण आता एक अशी खबर आहे, जी ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. होय, दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनाही तैमूरची भुरळ पडली आहे. मधूर यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी एक नाव रजिस्टर केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘तैमूर’. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. त्यामुळे येत्या दिवसांत आपल्या करिना व सैफच्या लाडक्या मुलाच्या नावाचा चित्रपट पाहायला मळणार आहे. दोन वर्षांच्या तैमूरचे हे मोठे यश आहे.