सैफ-करिनाच्या घरी आला नवा पाहुणा, तैमूर अली खानला मिळाला नवा जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 11:29 IST2020-01-09T11:26:05+5:302020-01-09T11:29:39+5:30

तैमूर खूश्श...!!

taimur ali khan playing with little dog photo viral on social media | सैफ-करिनाच्या घरी आला नवा पाहुणा, तैमूर अली खानला मिळाला नवा जोडीदार

सैफ-करिनाच्या घरी आला नवा पाहुणा, तैमूर अली खानला मिळाला नवा जोडीदार

ठळक मुद्देआधी चिमुकला तैमूर फोटोग्राफर्सला हसून पोज द्यायचा. पण आताश: गर्दी व कॅमेरे पाहिले की, तो ओरडायला लागतो.

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा कोण करतेय?
सध्या तैमूर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, तैमूरच्या घरी नवा पाहुणा आला आहे. अरे नाही... तो तैमूरचा भाऊ नाही तर हा छोटा अतिथी म्हणजे तैमूरचा नवीन पाळीव कुत्रा आहे.

तूर्तास आपल्या नवीन कुत्र्यासोबतचे तैमूरचे फोटो खूप व्हायरल होत आहे. यापैकी काही फोटो करीना कपूरच्या फॅन पेजने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तैमूर आपल्या डॉगीसोबत मस्ती करताना, हसताना खेळताना दिसतोय. त्याचा क्यूट अंदाज बघण्यासारखा आहे.

तैमूर नुकताच आपल्या मम्मी पापासोबत स्वित्झर्लंडला व्हॅकेशनला गेला होता. याठिकाणचे त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते.
तैमूर कुठेही दिसो, तो दिसला की मीडियाचे कॅमेरे त्याच्याकडे वळतात.

आधी चिमुकला तैमूर फोटोग्राफर्सला हसून पोज द्यायचा. पण आताश: गर्दी व कॅमेरे पाहिले की, तो ओरडायला लागतो. लोकांवर चिडतो. खुद्द तैमूरचे डॅड सैफ अली खान याने अलीकडे ही माहिती दिली होती. तैमूरला सामान्य आयुष्य जगू द्या, असे आवाहनही सैफने यावेळी केले होते.
 

Read in English

Web Title: taimur ali khan playing with little dog photo viral on social media