सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमूर सांगतोय मला तैमूर नव्हे तर या नावाने मारा हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:27 IST2018-10-16T15:26:31+5:302018-10-16T15:27:50+5:30

सैफ अली खान आणि करिनाच्या तैमुरच्या फोटो काढण्यासाठी नुकतेच काही फोटोग्राफर्स गेले होते. त्यावेळी तैमूर आपल्या नॅनीसोबत गाडीतून उतरला. फोटो काढण्यासाठी सगळेच फोटोग्राफर तैमूरला हाका मारत होते. पण त्यावेळी तैमूरने फोटोग्राफर्सना खूपच छान प्रतिसाद दिला.

Taimur Ali Khan corrects paparazzi, tells them his name is Tim | सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमूर सांगतोय मला तैमूर नव्हे तर या नावाने मारा हाक

सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमूर सांगतोय मला तैमूर नव्हे तर या नावाने मारा हाक

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर दिसला रे दिसला की, पापारझींचे कॅमेरे त्याची छबी टिपण्यासाठी पुढे सरसावतात. तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक मीडियावर टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रियतेत त्याचा जराही फरक पडलेला नाही. करिना आणि सैफ देखील आपल्या या लाडक्या मुलाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना सैफचे आणि करिनाचे चाहते भरभरून प्रतिसाद देतात. 

सैफ अली खान आणि करिनाच्या तैमुरच्या फोटो काढण्यासाठी नुकतेच काही फोटोग्राफर्स गेले होते. त्यावेळी तैमूर आपल्या नॅनीसोबत गाडीतून उतरला. फोटो काढण्यासाठी सगळेच फोटोग्राफर तैमूरला हाका मारत होते. पण त्यावेळी तैमूरने फोटोग्राफर्सना खूपच छान प्रतिसाद दिला. तैमूर या नावाने त्याला हाक मारत आहेत हे ऐकताच मला टिम म्हणा असे तो म्हणाला आणि एवढेच नव्हे तर फोटोग्राफर्सना तो बाय करत देखील गेला.

 

सैफ अली खान आणि करिना तैमूरला घरात लाडाने टिम असे म्हणतात. त्यामुळे त्याला त्याचे हेच नाव चांगल्याप्रकारे माहीत आहे. त्याला टिम याच नावाने हाक मारलेली आवडते असे तैमूरच्या या व्हिडिओवरून दिसून येत आहे. 

तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीला त्याचे हेच नाव वादाचा विषय बनले होते. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडी त्याचे नाव आहे. करिना आणि सैफ यांचा मुलगा तैमूर खूप लहान असला तरी खूप लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. तसेच तैमूरदेखील कॅमेऱ्यासमोर अजिबात घाबरत नाही. उलट तो स्माइल देतो. सैफ करिना तैमूरला जास्त अटेन्शन मिळत असल्यामुळे थोडे त्रस्त आहेत. याबाबत करिनाने सांगितले होते की, मला वाटते की तैमूरला गरजेपेक्षा जास्त अटेन्शन मिळत आहे. तैमूरचे बालपण देखील इतर लहान मुलासारखे असावे, असे आम्हाला वाटते.

Web Title: Taimur Ali Khan corrects paparazzi, tells them his name is Tim