स्वतःच्या शरीरावर प्रेम करा म्हणत या अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला बोल्ड फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 16:24 IST2021-02-17T16:09:29+5:302021-02-17T16:24:11+5:30

या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Tahira Kashyap shares inspirational post on self love. | स्वतःच्या शरीरावर प्रेम करा म्हणत या अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला बोल्ड फोटो

स्वतःच्या शरीरावर प्रेम करा म्हणत या अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला बोल्ड फोटो

ठळक मुद्देताहिराने देखील तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि आपल्या शरीरावर प्रेम करा हा संदेश त्याच्यासोबत दिला आहे.

आयुषमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ताहिराने नुकताच एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याचसोबत एक खूप चांगला मेसेजदेखील दिला आहे. अमेरिकन मॉडेल केंडल जेनर सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने तिच्या एका व्हिडिओच्या संदर्भात काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील एका फोटोत ती लाल रंगाच्या बिकनीत दिसत असून तिची फिगर पाहून तिचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हा फोटो पाहून ताहिराने देखील तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि आपल्या शरीरावर प्रेम करा हा संदेश त्याच्यासोबत दिला आहे.

आयुष्यमानने 2011 मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी 11 वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा 16 वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. आयुष्मान एक चांगला गायक आणि गीतकारही आहे. ‘विकी डोनर’मधील पानी दा रंग हे गाणे आयुष्यमानने स्वत: लिहिले होते, शिवाय स्वत:च ते गायले होते. आयुषमानने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Tahira Kashyap shares inspirational post on self love.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.