तब्बू झळकणार दाक्षिणात्य सिनेमात, तिच्यासोबत दिसणार बाहुबली फेम हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 21:00 IST2019-04-19T21:00:00+5:302019-04-19T21:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. आता तब्बू लवकरच तेलगू चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

Tabu will be seen in the south film, along with her, Bahubali Fame is an actor | तब्बू झळकणार दाक्षिणात्य सिनेमात, तिच्यासोबत दिसणार बाहुबली फेम हा अभिनेता

तब्बू झळकणार दाक्षिणात्य सिनेमात, तिच्यासोबत दिसणार बाहुबली फेम हा अभिनेता


बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. आता तब्बू लवकरच तेलगू चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार तब्बू एका तेलुगू चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटात प्राध्यापिका आणि नागरी हक्क कार्यकर्तीच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.

तसेच तब्बूसह राणा दुग्गाबती आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपट ‘निडी नाडी ओके काथा’चे सुप्रसिद्ध दिग्दर्शक वेणू उडुगुल करणार आहेत. या तेलुगू चित्रपटाची कथा तब्बूला ऐकवण्यासाठी वेणू मुंबईला आले होते. परंतु तब्बूने अद्याप या चित्रपटात काम करण्यास होकार दिला नसल्याचे समजते आहे.


डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक वेणु उडुगुला गेल्या महिन्यात चित्रपटाची कहाणी तब्बूला ऐकवण्यासाठी मुंबईत आले होते. या चित्रपटातील स्क्रिप्ट आणि त्यातील भूमिकेबद्दल ऐकताच तब्बूला कुतूहल वाटले. उत्साहाने तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. परंतु तब्बूने अद्याप कोणताही करार केलेला नाही. या चित्रपटात राणा दुग्गाबती एका पोलिसाची भूमिका साकारणार असून साई पल्लवी नक्षलवाद्याच्या भूमिकेत दिसणार आहे.


तब्बू तिचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात तब्बू अभिनेता अजय देवगणच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

तसेच हा चित्रपट अकिव अली दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय आणि तब्बूसोबत राकूल प्रित सिंगदेखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Tabu will be seen in the south film, along with her, Bahubali Fame is an actor