तापसी पन्नू 'दोबारा'मध्ये दिसणार वेगवेगळ्या लूकमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 21:00 IST2022-08-05T21:00:18+5:302022-08-05T21:00:46+5:30
Taapsi Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तापसी पन्नू 'दोबारा'मध्ये दिसणार वेगवेगळ्या लूकमध्ये!
एकता आर कपूर आणि अनुराग कश्यप यांच्या नव्या युगातील थ्रिलर 'दोबारा'(Dobara Movie)चा ट्रेलर ही त्याच्या रहस्यमय दुनियेतील रोलर कोस्टर राईडची सुरुवात आहे असे म्हणता येईल. चित्रपटात तापसी पन्नू पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार असून प्रेक्षक तिला चित्रपटाचा सस्पेन्स पुढे घेऊन जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या लूकमध्ये पाहतील. अनुराग कश्यपची 'दोबारा' ही खरोखरच एक प्रकारची 'टाइम ट्रॅव्हल' कथा आहे जी भारतीय प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.
अनेक न उलगडलेल्या रहस्यांच्या दुनियेत अडकलेली तापसी पन्नू यात अशीच एक भूमिका साकारताना दिसणार असून प्रेक्षकांना ती दोन वेगवेगळ्या जगात फिरताना दिसेल. चित्रपट डबल-रोलचा शोध न घेता भूत आणि वर्तमानातील तिच्या उपस्थितीचा भ्रम स्वतंत्रपणे कॅप्चर करतो. चित्रपट तिच्या सभोवतालच्या रहस्यांची उत्तरे शोधण्यासाठी संघर्ष करत असताना, ती दोन्ही टोके कशी जोडते हे पाहणे रोमांचक असेल.
पुरस्कार विजेती अभिनेत्री तापसी पन्नू अभिनीत हा चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे आणि शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांच्या कल्ट मूव्हीजने याची निर्मिती केली आहे, बालाजी टेलिफिल्म्स आणि सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस (एथेना) अंतर्गत ही नवीन शाखा आहे. दोबारा चित्रपट १९ ऑगस्टला रिलीज होणार आहे.