Taapsee Pannu : प्लीज, आमचा चित्रपटही बायकॉट करा..., तापसी पन्नू -अनुराग कश्यपची अजब डिमांड, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:04 IST2022-08-09T17:00:37+5:302022-08-09T17:04:14+5:30
Taapsee Pannu On Film Boycott: तापसी व अनुराग दोघांनी आपल्या ‘दोबारा’ या चित्रपटाला बायकॉट करण्याचं आवाहन केलं आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.

Taapsee Pannu : प्लीज, आमचा चित्रपटही बायकॉट करा..., तापसी पन्नू -अनुराग कश्यपची अजब डिमांड, पण का?
Taapsee Pannu On Film Boycott: दिग्दर्शक अनुराग कश्यपचा एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं नाव आहे ‘दोबारा’ (Dobaaraa) आणि या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे ती अभिनेत्री तापसी पन्नू. सध्या अनुराग व तापसी पन्नू (Taapsee Pannu) आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अनुराग व तापसीच्या प्रमोशनल इव्हेंटची जोरदार चर्चा होतेय. पण आमिर व अक्षयच्या चित्रपटांसारखी या चित्रपटाची चर्चा नाही... अशात तापसी व अनुराग दोघांनी आपल्या या चित्रपटाला बायकॉट करण्याचं आवाहन केलं आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.
सध्या आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या दोन्ही चित्रपटांना सोशल मीडियावर विरोध होताना दिसत आहे. सोशल मीडियावर #BoycottLalSinghChaddha आणि #BoycottRaksha Bandhan ट्रेंड करत आहेत. अशात अनुरागने आमच्या चित्रपटालाही बायकॉट करून ट्रेंडमध्ये आणण्याचं आवाहन केलं. ‘मला बाहेर फेकल्यासारखं वाटू लागलं आहे. माझा सिनेमा सुद्धा बायकॉट करा... प्लीज आमच्या चित्रपटालाही बायकॉट करून ट्विटरवर ट्रेंड करा,’ असं अनुराग म्हणाला.
तापसीनेही अनुरागला लगेच दुजोरा दिला... ‘बायकॉटदोबारा’ ट्रेंड करवा दो यार... आम्हाला सुद्धा ट्विटरवर ट्रेंड व्हायचं आहे. आमिर खान व अक्षय कुमार बायकॉट होऊ शकतात तर या लीगमध्ये मी सुद्धा सामील होऊन इच्छते... प्लीज, सिनेमा पाहा वा पाहू नका... पण प्लीज बायकॉट करा..., असं ती म्हणाली.
अनुराग व तापसी आपल्या सिनेमावर बहिष्कार टाका, असं का सांगत असावे, यामागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेलच. पब्लिसिटीसाठी बायकॉट होणं सुद्धा गरजेचं आहे, एकप्रकारे हेच त्यांना सांगायचं आहे. बायकॉट ट्रेंड कुठे ना कुठे फायद्याचं ठरत आहे, हेच यातून दिसतंय.
आमिर व अक्षयच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. मात्र असं असलं तरी दोन्ही चित्रपटांचे अॅडवान्स बुकिंग जोरात सुरू आहे. शिवाय सोशल मीडियावरही याच दोन चित्रपटांची चर्चा आहे. म्हणूनच कदाचित ट्रेंडमध्ये राहण्याचा मोह तापसी आणि अनुराग कश्यपला पण आवरता आला नाही.
तापसीच्या ‘दोबारा’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा एक रहस्यमयी, गूढ, आणि थरारक असा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. येत्या 19 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.