Exclusive : आणि ओक्साबोक्शी रडली होती तापसी पन्नू, वाचा काय आहे यामागचे कारण

By गीतांजली | Updated: October 8, 2019 15:10 IST2019-10-08T14:57:08+5:302019-10-08T15:10:17+5:30

 ‘सांड की आँख’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बी-टाऊनमधील काही अभिनेत्रींनी तापसीवर निशाणा साधला होता.

Taapsee pannu got emotional while reading saand ki aankh movie script | Exclusive : आणि ओक्साबोक्शी रडली होती तापसी पन्नू, वाचा काय आहे यामागचे कारण

Exclusive : आणि ओक्साबोक्शी रडली होती तापसी पन्नू, वाचा काय आहे यामागचे कारण

तापसी पन्नूचा  ‘सांड की आँख’ हा सिनेमा या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने सिनेमाशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी बोलताना तापसी म्हणाली, मला ज्यावेळी या सिनेमाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला अश्रू अनावर झाले होते. पुढचा काही वेळा मी फक्त रडते होते आणि स्क्रिप्ट वाचल्यावर या सिनेमाला मी लगेच होकार दिला होता. मी हा सिनेमा करतेय असे दिग्दर्शकाला मी क्षणचा विलंब न करता सांगितले होते. 


सांड की आँख' जगातील वयस्कर शार्पशूटर असलेल्या चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. या दोघींची भूमिका तापसी आणि भूमी साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत.


या चित्रपटाची निर्मिती निधी परमार व अनुराग कश्यप करत आहेत. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Taapsee pannu got emotional while reading saand ki aankh movie script