T20 World Cup : पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष, टीम इंडियाचं तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:23 IST2026-02-16T14:08:52+5:302026-02-16T14:23:29+5:30
पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूड स्टार्स काय म्हणाले?

T20 World Cup : पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष, टीम इंडियाचं तोंडभरून कौतुक
T20 World Cup India Vs Pakistan : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बहुचर्चित सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करून दाखवत पाकिस्तान विरुद्धचा आपला दबदबा कायम राखला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज लढतीत भारतीय संघाने ६१ धावांनी मोठ्या विजयासह सुपर ८ मध्ये प्रवेश केला. मैदानावरील या विजयाचे पडसाद बॉलिवूडमध्येही उमटले असून अजय देवगण, अर्जुन रामपाल आणि अनुपम खेर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.
भारतीय संघाच्या जबरदस्त कामगिरीने भारावलेल्या अजय देवगणने इन्स्टाग्रामवर खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणाला, "या अद्भुत संघाने विजय खूप सोपा केला आहे. काय खेळ झाला".
This brilliant team makes winning look like a cakewalk
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 15, 2026
Kya khela hai! 🙌🇮🇳#IndVsPak#T20WorldCup2026
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये इशान किशनने अवघ्या ४० चेंडूत ७७ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. यावर विवेक ओबेरॉयने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, "इशान किशनची ७७ धावांची तुफानी खेळी आणि बुमराह-हार्दिकची धारदार गोलंदाजी पाहून मी आनंदाने इतका ओरडलो की अजूनही माझे कान माझ्याच आवाजाने घुमत आहेत. आपल्या 'बॉईज इन ब्लू'ला अधिक ताकद मिळो", अशा शब्दांत विवेकने आनंद व्यक्त केला.
Ye mauka bhi..….gaya.
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) February 15, 2026
Absolute mammoth 77 off 40 balls by Ishan Kishan and kickass early wickets by @Jaspritbumrah93 and @hardikpandya7.
My ears are ringing from my own screaming throughout the match!
More and more power to our men in Blue!#IndvsPakhttps://t.co/omXt7tIqeP
अभिनेता रितेश देशमुखनेही टीम इंडियाचा विजय त्याच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "जय जय जय जय हे".
Jaya Jaya Jaya …. Jai Hey !!!! 🇮🇳
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 15, 2026
अभिनेता अर्जुन रामपालने सुपर ८ मधील प्रवेशाबद्दल संघाचं अभिनंदन केले. त्याने लिहिले, "शाब्बास! किती शानदार कामगिरी. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि इशान किशनला खास शुभेच्छा".
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सामन्यातील एक खास क्लिप शेअर करत "हर हर महादेव, जय भोलेनाथ" म्हणत हा विजय साजरा केला.
हर हर महादेव! जय भोलेनाथ।😍🕉🇮🇳🇮🇳🇮🇳 #INDvsPAKpic.twitter.com/L7AQd8QnCG
— Anupam Kher (@AnupamPKher) February 15, 2026